________________
पाण्यांशी भातृभाव असावा. मनुप्य जर स्वतःला मनुष्य म्हणतो तर त्या उच्चकोटीच्या बात मानवीय गुणातील प्रथम गुण 'मैत्री' आहे. त्याला हृदयात स्थान असलेच
पाहिजे.११
आज आपण पाहतो एक समाज दुसऱ्या समाजावर, एक पार्टी दुसऱ्या पार्टीवर, राष्ट दसऱ्या राष्ट्रावर हावी होत आहे. अशावेळी शांती, संतोष, त्याग, साधना या गोष्टींचे इतके मूल्य नाही, जितके मैत्रीचे मूल्य आहे.
मैत्रीची आराधना म्हणजे शक्तीची आराधना, सहिष्णुता एक शक्ती आहे. जोपर्यंत शक्तीची उपासना होणार नाही तोपर्यंत मैत्री भाव स्थिर होऊ शकत नाही. निर्बल मनुष्य दिवसातून शंभर वेळा मैत्रीचा निश्चय करतो आणि शत्रुत्वाच्या भावनेला हृदयातून काढून टाकतो. परंतु नंतर अशी परिस्थिती येते की शत्रुत्वाचा भाव मनावर आक्रमण करतो. त्यापासून परावृत होण्यासाठी सहिष्णुताची शक्ती पाहिजे.
___ मैत्रीतील 'मै' अक्षर आपल्याला सूचना देते की, जो 'मै'ची रक्षा करतो तीच / मैत्री. म्हणून 'मै'ला विराट बनवा जिथे 'तू'चा लवलेश ही नसणे ही मैत्री आहे.
मैत्री भावनेशिवाय धर्मध्यान सुद्धा होऊ शकणार नाही. धर्मध्यान करण्याचे माध्यम मन आहे. मनाला मैत्री भावनेने पवित्र करायला पाहिजे. आर्तध्यानातून मनाला मुक्त करून धर्मध्यानात लीन करण्यासाठी मैत्री भावनेची परम आवश्यकता आहे.
जेव्हा मैत्री भावना अंतःकरणपूर्वक होते तेव्हा शरीरसुद्धा स्वस्थ राहते. मोठा आजार समजा जडलाच तर सहन करण्याची शक्ती राहते. असाध्य आजार झाला तरी अशा व्यक्तींचा चेहरा हसतमुख राहतो. इतकेच नव्हे तर मृत्यूचा सुद्धा हसता-हसता स्वागत करतात.
___चारीही योग भावनांमध्ये मैत्री भावनाचे अधिक महत्त्व आहे. कारण की मैत्री सब प्राणीमात्रांशी असायला हवी. प्रमोद भावना फवत गुणीजनांसाठी, करुणाभावना दुःखी जावासाठी, माध्यस्थ भावना अथवा उपेक्षा अविनित जीवांसाठी केली जाते. ह्याच दृष्टीने तर मैत्री भावनेचे महत्त्व अधिक आहे. मैत्री असेल तरच प्रमोद, करुणा, माध्यस्थ भावना १ शकतात. दान देण्यासाठी धन पाहिजे. परंतु जीवमात्राच्या कल्याणाच्या भावनेसाठी
फक्त उदार मन पाहिजे.
सुख-दुःख तर प्रत्येकाच्या जीवनात येत जात राहतात. स्वसुख प्राप्ती आणि ख निवारण संबंधी तीव्र संक्लेश जीवात्माच्या मनात होत राहतो. त्या संक्लेशापासून