________________
शकेन अशीच माझी वृत्ती बनो.
मनिश्रींनी संस्कृत गीतिकाच्या माध्यमाने करुणा भावनेचे जे भावमय चित्र अंकित केले आहे ते खूपच प्रेरणास्पद आहे.
माध्यस्थ भावनासंबंधी लिहितात - माध्यस्थ भावनेत एक अपूर्व रस आहे. या संसारात राग-द्वेषाने आंदोलित, रागात्मक द्वेषात्मक प्रवृत्तीने भरलेले अनेक व्यक्ती आहेत, अनेक सुखी आहेत. दुःखी आहेत. अस्थिर चेता आहेत. अशा लोकांच्याबद्दल मनात उदासीनतेचा भाव ठेवणेच श्रेयस्कर आहे. कारण की त्यांचे प्रश्न कोण उलगडणार ? त्यातच ते इतके गुरफटलेले असतात. व्यथित दुःखी असतात. म्हणून अनुकूल प्रतिकूलप्रिय अप्रिय इ. विविध भावनेने अप्रभावित राहून साधकाने माध्यस्थ भावना ठेवावी. तरच अंतःकरण सद्भावना तथा सद्प्रवृत्तीमध्ये स्थिर राहू शकेल. बाह्य प्रवृत्तीपासून दूर रहावे. अशा प्रकारे चार योग भावना अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. अनेक लेखकांनी सुद्धा यांचे वर्णन केले आहे. आता आपण एक-एक भावनेचे विस्तृत समीक्षण करू या.
मैत्री भावना यापूर्वी आपण चार योग भावनांचे सलग विवेचन केले. आता प्रत्येक भावनेचा स्वतंत्रपणे विचार करू या.
जगात 'मित्र' शब्द फारच प्रिय आहे. मैत्रीचा सामान्य अर्थ आहे. कोणालाच शत्रू मानू नये. तशी ही व्याख्या आपल्याला सामान्य वाटली तरी जैन दर्शनाचा मुख्य सिद्धांत 'अहिंसा' याचा यात समावेश आहे.
। प्रश्न असा पडतो की मैत्रीची सुरवात कुठून करावी ? श्री रत्नचंद्रजी महाराजांनी मंत्रीचा क्रम सांगताना लिहिले आहे- मैत्रीचे प्रथम पात्र एका उदरातून जन्मलेले भाऊ व महाण आहे. कारण की-त्यांचा सहवास सहज घडतो. रक्ताचे नाते असल्यामळे त्यांची मंत्री स्वयंसिद्ध आहे. त्यानंतर मैत्रीचे पात्र पुत्र आणि पत्नी. तसे पाहिले तर पुत्र प्रथम अवस्थत पालनीय आहे. त्यास 'मैत्री' नाही म्हणू शकत. तरी पण "प्राप्ते तु पोडशे वर्षे न मित्रवदाचरते" या प्रसिद्ध नैतिक पद्यानुसार सोळा वर्षाच्या वयानंतर पुत्राला मित्र मानले पाहिजे. पत्नीलासुद्धा आपली गुलाम नाही तर जीवन सहचारिणी, मित्र मानले पाहिजे.
पश्चात् कुटुंबीय आणि नातेवाईक यांच्याशी मैत्रीचा नंबर येतो. अर्थात् त्यांच्याशी मैत्रीभावनेने हृदयाची एकता स्थापित करावी.