________________
(५८९)
ते एके ठिकाणी आपल्या स्वत:ला संबोधित करताना म्हणतात, आत्मन ! तू श्री प्रमोद, करुणा आणि मध्यस्थता या भावनांना आपल्या जीवनात आण. प्रयत्नपूर्वक
भावनांचे चिंतन कर तथा आत्मलीनतामध्ये अध्यात्म भावनेत थकल्याचा बिल्कुल अनभव न करता आत्मलय अध्यात्मभावात आनंदानुभूती कर.९
जीवनात समत्व, समता याचे फार मोठे स्थान आहे. मानव आपल्या क्षुद्र चिंतन आणि संकीर्ण स्वार्थवृत्तीमुळे समत्वापासून दूर होतात. त्याच्या चित्तात विषमता व्याप्त होते. धन, जाती, वर्ण, वर्ग, सत्ता सामर्थ्य साधन सामग्री इ. अनेक पदार्थ परिस्थिती मनष्याला समतापासून दूर नेतात. जीवन अवनतेकडे जाऊ लागते. या अवनत अवस्थेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्या अंत:करणात समता सुप्रतिष्ठित करण्यासाठी मुनिसुन्दरसूरीजींनी मैत्री, करुणा, प्रमोद आणि माध्यस्थ भावना फार उपयोगी आहे असे सांगितले आहे. या भावनांनी चित्ताला अनुभावित केल्याने वैषम्य भाव क्षीण होतो तथा साम्यभाव संवर्धित होतो.
शतावधानी पंडितरत्न मुनीश्री रत्नचंद्रजी महाराजांनी मैत्री इ. भावनांचा संस्कृत गीतिकामध्ये सुंदर वर्णन केले आहे.१० त्यांनी मैत्री संबंधी म्हटले आहे. मनुष्याच्या हृदयात जर मैत्री भावनेची भावना दृढ झाली तर तो मनुष्य खऱ्या आंतरिक सौंदर्याने भरून जातो. तो सहज मधुर व पवित्र भावनेने ओतप्रोत होतो. ज्याप्रमाणे एक व्यक्ती आपल्या भाऊ, बहीण, पुत्र, पत्नी व अन्य कुटुंबातील लोकांशी मैत्री भाव ठेवते, तसाच भाव तिच्या हृदयात सर्व प्राणीमात्रांबद्दल उत्पन्न होतो. हा आहे मैत्रीभावनेचा आदर्श.
_ प्रमोद भावनेच्या विवेचनात मुनिश्री आपल्या मनाला संबोधित करताना म्हणतात की, हे मन! तू सदगुणांचे गुणगान करण्यात, त्याची प्रशस्ती करण्यात, संलग्न बन. असे चिंतन कर की, ज्यांनी उत्तम गुणांचे अर्जन केले आहे, जो सेवाधर्मात रत आहे, न्याय पथावर चालतात, सदाचरणशील आहेत, धर्म आराधनेत तत्पर आहेत, ते खऱ्या अर्थान धन्य आहेत. अशा प्रकारे उत्तम गुणांनी युक्त पुरुषांना पाहून आपल्या मनात प्रमोद किंवा
प्रसन्नचेचा अनुभव करा.
करुणा भावनेच्या विवेचनात करुणेला व संबोधित करताना म्हणतात- हे करुणा मा तुला आवास देतो. स्थान देतो. लोकांचे दःख दर कर. या संसारात असे कितीतरी क आहेत ज्यांना कोणाचाही आधार नाही, सहारा नाही. ज्यांचे पालनपोषण करणारे णा नाही. अंध, बधिर, मूक इ. विकलांग आहेत, अशा लोकांच्याबद्दल करुणाशील बनू