________________
न माझ्या मनात दया, करुणा, अनुकम्पा भाव निर्माण होवो. जे माझ्याशी द्वेष भावाने
माहो अहित चिंततात, त्यांच्याबद्दल सुद्धा माझ्या मनात मध्यस्थता-भाव असावा उदासीनतेचा भाव असावा.
थोड्या शब्दात विद्वान आचार्यांनी चार ही भावनांचे सजीव चित्र अंकित केले आहे श्लोकाचे उच्चारण केल्याबरोबर हृदयात भाव जागृत होतात. राग-द्वेषाच्या ग्रंथी शिथिल होऊ लागतात.
दि हा एकमेव असा श्लोक आहे की, लाखो जैन आदराने नित्यप्रती स्मरण करतात. अत्यंत सोप्या शब्दात, मधुरतापूर्वक चार प्रकारच्या उत्कृष्ट भावना रचनाकारांनी यात उपस्थित केल्या आहेत.
__ हे चिंतन खरोखर एका योग्याचे चिंतन आहे. वैराग्याची पुढची पायरी 'योगी'ची आहे. म्हणून आपण हे ही स्वीकारू शकतो की १२ वैराग्य भावना केल्याने मनाला संस्कारीत करून नंतर योग भावनाच्या पुढच्या पायरीवर चढू शकतो. वैराग्या नंतरची ही पुढची स्थिती आहे.
- सांसारिक मनुष्य दैनंदिन व्यवहारमय जीवनात एकाकी नाही. तो मानव समुदाय रूप समाजाचा एक अंश आहे. अनेक मानवांचा समूह मिळून समाज बनतो. समाजात राहणारा मनुष्य कोणत्या ना कोणत्या संबंधाने एकमेकांशी जडलेले असतात. त्या संबंधाच्या आधारावर पारिवारिकता, सहकर्मिता, सहचारिता इ. आधारित आहेत. एखाद्याच्या मनाच्या अनुकूल व्यवहार नसला तर व्यक्तीच्या मनात त्या व्यक्तीबद्दल दुरावा निर्माण होतो. किंवा संशय निर्माण झाला की अमुक व्यक्ती माझे अहित करू पाहतो, माझी निंदा करतो, वाईट करतो मग मनात द्वेष, वैरभाव निर्माण होतो. हा भावनांचा एक असा व्यतिक्रांत रूप आहे जो जीवनाला दुःखमय करून टाकतो. इतकेच काय, अशाने अंतःकरणाची पवित्रता सुद्धा नष्ट होते. क्रोधादी कषाय उत्पन्न होतात. ज्या आत्म पतनाच्या कारण रूप बनतात.
- मानव नेहमी अशा मनोवृत्तीत राहू नये या हेतूने जैनाचार्यांनी मैत्री इ. भावनांचा विशेष निर्देश केला आहे. मैत्री इ. भावना अशा पवित्र चिंतनावर आधारित आहेत. ज्यामुळे
वष इ. सारख्या तच्छ वृत्तीपासून दर राहतो. मानव मनाने फार दर्बल आहे. थोडे मनाविरुद्ध घडले तर संतुलन बिघडते. कोपाविष्ट होतो. संघर्ष करण्यास तत्पर होतो. । ३. भावनांच्या चिंतनाने या सर्वांवर आळा बसतो. त्यामुळे मनाची भूमिका इतकी