________________
(५८६)
भावना आहे. सुखबद्दल राग (आसक्ती) न ठेवणे म्हणजे उपेक्षा भाव आहे. याचा साय असा की, सुख सर्वांनाच प्रिय असते. म्हणून त्या परिस्थितीत सर्वांना रस वाटतो. बाची स्थिती कधी जाऊच नये याचा प्रयत्न करीत असतात. परंतु दुःख कोणालाच को असते. दुःख अप्रिय वाटते. पण संयमी साधक या दोन्ही परिस्थितीत समभावाने मनात त्यांना सुखात आसवती नसते व दुःखाबद्दल खेदही नसतो. दोन्हींच्या पलीकडची त्यांची अवस्था असते.
___ आचार्य पूज्यपाद यांनी तत्त्वार्थसूत्राच्या सातव्या अध्ययनातील अकराव्या सत्राची व्याख्या करताना सर्वार्थसिद्धी नामक टीकेमध्ये चार भावनांचा उल्लेख व विवेचन केले आहे. दुसऱ्यांना आपल्याकडून दुःख होऊ नये अशी अभिलाषा असणे म्हणजे मैत्री. सुखामुळे प्रसन्नता इ. द्वारा आंतरिक भक्ती आणि अनुराग प्रकट होणे प्रमोद भावना. दीन-अभावग्रस्त, क्लेशयुक्त प्राणीबद्दल दयाभाव असणे कारुण्य भावना-राग-द्वेष युक्त पक्षपात न करणे, माध्यस्थ भावना. दुष्कर्मांच्या परिणामामुळे जीव भिन्न-भिन्न योनीत जन्म घेतो, मरतो. हे सत्त्व होय. सत्त्व जीव म्हणजे सम्यग्ज्ञान इ. गुणांनी उन्नत आहेत. त्यांना गुणाधिक म्हटले जाते. असातावेदनीय कर्माच्या उदयामुळे जो दुःखी आहे. त्यांना किलाष्यमान म्हटले जाते. ज्यांच्यात जीवादी पदार्थांना ऐकणे व ग्रहण करणे हा गुण नाही, त्यांना अविनेय म्हटले जाते. अविनेय म्हणजे ज्यांना समजावू शकत नाही असे जीव. या सत्व इ.मध्ये क्रमशः मैत्री इ.ची भावना करायला पाहिजे. जो सर्व जीवांशी मैत्री, गुण विशिष्ट जीवात प्रमोद, कष्ट भोगणाऱ्या जीवाबद्दल कारुण्य आणि अविनयी यांच्याबद्दल माध्यस्थ भावना ठेवतो, त्याचे अहिंसा इ. व्रत पूर्णतेला प्राप्त करतात.६
_आचार्य अमितगति यांनी मैत्री इ. चार भावनासंबंधी एक फार सुंदर लोक लिहिला आहे
सत्वेषु मैत्री गुणिषु प्रमोदं, क्लिष्टेषु जीवेषु कृपापरत्वम् ।
माध्यस्थभावं विपरीतवृत्तौ, सदा ममात्मा विदधातु देव ।। ते जिनेन्द्र देवांना उद्देशून म्हणतात- हे प्रभो ! आपल्या प्रेरणेने माझ्या आत्म्यात स पवित्र, उदात्त भाव जागत व्हावे की मी संसारातील सर्व प्राणीमात्राशी मैत्री भाव जन, सर्वांना मी मित्र मानीन व सर्वांबद्दल माझ्या मनात सौहार्द्र भाव ठेवीन, गुणवानांबद्दल
भाव निर्माण होईल. त्यांना पाहून मनात आनंद, प्रसन्नताचे भाव निर्माण होतील. अनक जीव अनेक प्रकारच्या द:खाने ग्रस्त आहेत. कष्टाने पीडित आहेत. त्यांना
संसारात अनेक जीव अनेक प्रकारच्या