________________
(५८४)
मैत्री इत्यादी चार भावना योग मनाला वैराग्य रसाने परिपूर्ण करणाऱ्या बारा भावनांचे चिंतन मागील प्रकरणात गेले आहे. अनित्य, अशरण, संसार एकत्व, अन्यत्व वगैरे बारा भावना शिवाय अशाखात मैत्री, प्रमोद, करुणा व माध्यस्थ या भावनांचा समावेश केला आहे. या चार भावना, बारा भावनांच्या पूरक आहेत. बारा भावना तात्त्विक दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. त्या आत्मोपलब्धीच्या दृष्टीने साधकाला प्रेरणा देणाऱ्या आहेत. मैत्री वगैरे चार भावना साधकाच्या दैनंदिन व्यावहारिक जीवनाला मधुर, पवित्र आणि सौम्य करण्यासाठी फारच उपयोगी आहेत.
आचार्य उमास्वातींनी तत्त्वार्थ सूत्रात सातव्या अध्ययनात व्रताच्या पाच-पाच भावनांचे विवेचन केले आहे. मग त्यांनी काही अशा सार्वजनिक भावनांचे वर्णन केले आहे ज्यामुळे एका धार्मिक व्यक्तीच्या जीवनात निर्मलता आणि सात्विकता येते. त्याच संदर्भात त्यांनी मैत्री, प्रमोद, कारुण्य तथा माध्यस्थ या चार भावनांचा उल्लेख केला आहे.३
। एकाच सूत्रात त्यांनी त्याचे लक्षण ही सांगितले आहे. मैत्री या शब्दाबरोबर त्यांनी सत्य शब्द जोडला आहे. जो प्राणीमात्राचे द्योतक आहे. सर्व सत्त्व किंवा प्राणीमात्राशी एक धार्मिक व्यक्तीने मित्रताची भावना ठेवावी. कोणाही बद्दल शत्रुता, विरोधता आणि अप्रियता नसावी. ही मैत्री भावना आहे.
गुणांमुळे जीवनात विशेषता येते, व्यक्तीचे हेच अलंकार आहेत. गुण म्हणजे सत्य, शील, शौच, सदाचार तथा साधना इ. उत्तम भाव. हे ज्यांच्यात विशेष रूपाने असतात, हे गुण ज्यांच्यात अधिक प्रमाणात असतील त्यांच्याबद्दल मनात प्रमोद, प्रसन्नता, हर्ष व्हायला पाहिजे. हा संसार मोठा विचित्र आहे. अधिकांशातः व्यक्ती अशा असतात ज्या उत्तम गुण युक्त व्यक्तींना पाहून इर्षा करतात, जळतात. ही फार दूषित प्रवृत्ती आहे. याने आत्म्याचे पतन होते. अशा निकृष्ट भावनेपासून आपण स्वतःला सदैव दूर ठेवावे. यासाठी "प्रमोदभावना" फार उपकारक आहे.
हा संसार सुख-दुःखाने भरलेला आहे. यात अनेक सुखी आहेत तर अनेक दुःखी आहेत. दुःखी लोक आपआपल्या कर्माच्या अधीन अनेक प्रकारचे कष्ट भोगत आहेत. पाच्याबद्दल धर्मनिष्ठ व्यक्तीच्या मनात दया, करुणा, अनुकंपा असावी अशी अपेक्षा आहे. धर्मात करुणा व दया यांचे फार महत्त्व आहे. दुःखी लोकांवर दया करणे ही करुणा
भावना आहे.