________________
(५८३)
सामान्य साधकातून थोडा पुढे जाण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्याच्या हेतूने मैत्री । चार योग भावनांच्या चिंतनाकडे वळतो.
योग भावनांच्या चिंतनाने मनुष्य मानवतेच्या उच्च शिखरापर्यंत पोहोचतो. या
योग फक्त आध्यात्मिक जीवनासाठीच असे नाही. तर व्यावहारिक जीवनात ही याचा अतिशय उपयोग होतो.
मानवाची वाणी, वर्तन आणि विचार स्व-पर कल्याणरूप व्हावे यासाठी थकारांनी या चार भावनांना अतिशय महत्त्व दिले आहे. अरिहंत देवाबद्दल भक्ती आणि
मात्राशी मैत्री या विचाराने मानवाचे मन पवित्र, विशुद्ध होते. समर्पण आणि साधना यांच्या समन्वयाने निरंतर चिंतन, मनन करण्यासाठी या चार भावना मनुष्याच्या जीवनातील अमूल्य ठेवा आहे. साधकासाठी या उपकारी आणि कल्याणकारी तर आहेच, केवळ जैन दर्शनाचा नाही तर जगातील सर्व उत्तम दर्शनांचा, आत्मदर्शनांचा सार म्हणजे या चार योगभावना आहेत. या शुभभावनांनी युक्त साधकाला परम पवित्रेतेच्या, विशिष्ट प्रकाशाचा अनुभव येतो.
आचार्य शुभचंद्रजी,१ हेमचंद्रजी, हरिभद्रसूरी इ. अनेक मनीषींनी, या भावनांना ध्यान-सिद्धीसाठी चिंतन करण्याचा उपदेश दिला आहे.
आचार्य हरिभद्रसूरींनी 'योगबिंदू' ग्रंथात पाच योगांचे निरूपण केले आहे. त्यात योग्य प्रवृत्तीरूप अणुव्रत अथवा महाव्रतांचे पालन, मैत्री इ. भावनांनी ओतप्रोत होऊन शावानुसार चिंतन करण्याच्या वृत्तीला 'अध्यात्मयोग' असे म्हटले आहे. अर्थात अध्यात्मयोगी होण्यासाठी मैत्री इ. भावनांचे किती महत्त्व आहे, हे स्पष्ट होते. २ अध्यात्मयोगाचे दोन अधिकारी सांगितले आहे- १) अणुव्रतधारी श्रावक २) महाव्रतधारी साधू.
। जे योग्य प्रवृत्ती करतात. जिनेश्वरांच्या वचनानुसार तत्त्वचिंतन करतात. त्यांच्या हृदयात प्राणिमात्राबदल मैत्री इ. भावना जागृत होतात.
'योगसार' मध्ये "धर्म कल्पद्रुमस्यैता मूलं मैत्रादि भावना' अर्थात मैत्री इ. भावनांना धर्मकल्पवृक्षचे मूळ म्हटले आहे.
अशा चार योग भावनांचे विवेचन या प्रकरणात केले आहे.