________________
हाSSSS
सारात असेही लोक आहेत जे अविनयी. अयोग्य. अपात्र आहेत. निष्कारण विरोध करण्यात, लोकांचे अकारण अहित करण्यात त्यांना काहीच वाटत नाही. कारण त्यांचा स्वभाव असतो. अशा लोकांबद्दल सुद्धा एक धार्मिक व्यक्ती मनात विपरीत येऊ देत नाही. अशा लोकाबद्दल मध्यस्थ किंवा तटस्थ भाव असावा. कारण च्याबद्दल कोणतेही विपरीत चिंतन केले तर आपलीच हानी होते. माध्यस्थ भाव ठेवल्याने मनात शांती राहते.
___ आचार्य हरिभद्रसूरी "योगबिंदू'मध्ये मैत्री इ. चार भावनांचे वर्णन करताना लिहितात की साधकाने सर्व प्राणीमात्रांबद्दल मैत्री भाव ठेवावा. जो पुरुष विद्या चारित्र इ. उत्तम गुणांनी युक्त असेल त्यांना पाहून साधकाच्या मनात आनंद निर्माण व्हायला पाहिजे. जे कष्ट, दुःख भोगत आहेत, त्यांच्याबद्दल मनात कारुण्य भाव असावा व अज्ञानी लोकांबद्दल व त्यांच्या अज्ञानपूर्ण कार्याबद्दल तटस्थ भाव ठेवावा.४
भगवती आराधना नावाच्या महान ग्रंथाचे रचयिता श्रीशिवार्य यांनी या चारही भावनांचे वर्णन करताना लिहिले आहे की, जीवाबद्दल मित्रभावाचे चिंतन मैत्री आहे. क्लेशयुक्त जीवांना पाहून मन कंपायमान होणे, त्यांच्यावर दया करणे करुणा आहे. साधकांच्या सदगुणांचे चिंतन करून मुदित होणे प्रमोद भावना आहे आणि सुखात्मकदुःखात्मक तसेच सुखाबद्दल अराग व दुःखाबद्दल अद्वेष यास उपेक्षा अथवा मध्यस्थ म्हटले जाते. ५ मा
_ भगवती आराधनाच्या संस्कृत टीकाकाराचे आचार्य श्रीअपराजितसूरी यांनी आपल्या 'विजयोदया' नावाच्या टीकेमध्ये या गाथाचे तात्त्विक विश्लेषण करताना लिहिले आहे की- अनंतकालापासून चार गतीमध्ये घटी चक्राप्रमाणे चतुर्गतिमय संसारात परिभ्रमण करीत आहे. प्रत्येक गतीमध्ये. सर्व प्राण्यांचे माझ्यावर अत्याधिक उपकार आहेत. म्हणून त्यांच्याबद्दल मित्रताची भावना ठेवणे मैत्री आहे. असहय, घोर, शारीरिक, आगन्तुक, अकस्मात येणारी व्याधी, दुर्घटना इ. व मानसिक एवं स्वाभाविक दुःख भोगताना त्या प्राण्यांना पाहून असा विचार करावा की बिचारे हे प्राणी मिथ्यादर्शन, अविरत, कपाय तथा अशुभयोग द्वारा उपर्जित कर्मरूप पुद्गल स्कन्धाच्या उदयामुळे उत्पन्न विपत्ती व कष्टाना विवश होऊन भोगत आहेत. ही करुणा भावना आहे, अनुकंपा भावना आहे.
यति-संयत आत्म्याच्या गुणांचे चिंतन करावे की या संयत आत्मा किती विनयशील, रागरहित, भयवर्जित, अभिमान शून्य रोषरहित व लोभरहित आहेत. ही मुदिता,