________________
(५८८)
ते की त्या व्यक्तीला मग सर्वच आपले मित्र वाटू लागतात. परिणामस्वरूप मनाची ना होते. विचारांची निर्मलता वाढते. जीवन प्रसन्न व उल्लसित राहते.
आध्यात्मिक साधनेच्या दृष्टीने सुद्धा मैत्री इ. भावना फार उपयोगी आहेत. कारण साधकाच्या मनात जोपर्यंत शत्रू, मित्र, उपकारक, अपकारक, इर्षा, विरोध, संघर्ष, म भाव असेल तोपर्यंत मानसिक दृष्टीने तो साधना करण्यास योग्य नाही. कारण की धर्म-आराधना बाह्य क्रिया कलाप व कर्मकाण्डात नाही. ती तर आत्म्याच्या विशुद्धीवर आधारित आहे.
जैनसिद्धांत दीपिकामध्ये म्हटले आहे की- “आत्मशुद्धि साधन धर्मः" अर्थात धर्म आत्म विशुद्धीचे साधन आहे. म्हणून विद्वान आचार्यांनी या भावनांना धर्माशी विशेप रूपाने जोडले आहे.
- जैन दर्शनात चार ध्यानांचे वर्णन आहे. त्यात धर्मध्यान करणारा साधक ज्ञान आणि वैराग्य याने संपन्न असावा, संवृतात्मा असावा, मन व इंद्रियांचा विजेता असावा. आपल्या स्वतःला सावध कर्मापासून संवृत्त करणारा असावा, स्थिर आशय युक्त किंवा दृढ संकल्पयुक्त, धैर्यशाली असावा. ते पुढे लिहितात, धर्मध्यानाची सिद्धी प्राप्त करण्यासाठी महापुरुषांनी मैत्री इ. चार भावनांचा आश्रय घेण्याचे विधान केले आहे.
___ आचार्य हेमचंद्रांनी या चार भावनांचे वर्णन ध्यानस्वरूपाबरोबर केले आहे आणि यांना खंडित ध्यानाला पुन्हा ध्यानान्तराशी जोडणारी अथवा ध्यानाला परिपुष्ट करणारे रसायन आहे असे म्हटले आहे. यावरून स्पष्ट होते की बारा भावनांचा संबंध मुख्यतः वैराग्य व निर्वेदाच्या जागृतीशी आहे. त्याचप्रमाणे या चार भावनांचा संबंध 'योग'शी जोडला गेला आहे. योगसाधनामध्ये मैत्री, प्रमोद इ. भावनांची विशिष्ट साधना प्रक्रिया चालते.
"अध्यात्मकल्पद्रुम''चे रचनाकार आचार्य श्रीमुनिसुन्दरसूरींनी चार भावनांचे सक्षिप्त स्वरूप वर्णन करताना लिहिले आहे की- आपल्या स्वतः शिवाय जगातील सर्व प्राण्यांचे हित करण्याची बुद्धी-मैत्रीभावना आहे. गुणाबद्दल पक्षपात, आदरभाव प्रमोदभावना आहे. जो प्राणी भव जन्म-मरण रूपी व्याधीने परिश्रांत आहे, पीडित आहे, त्यांना उत्तम बामकभावरूपी औषधीने स्वस्थ करण्याची इच्छा करुणाभावना आहे. ज्यांना समजावून
गतले तरी आपल्या दुर्वृतींचा त्याग करीत नाहीत अशा प्राण्यांबद्दल उदासीन भाव ठवणे किंवा उपेक्षा भाव ठेवणे माध्यस्थ भावना आहे.
स
मानMERIES