________________
(५९१)
अशाप्रकारे पुढे आपल्या गावातील लोक, अन्य जातीचे लोक, अन्यधर्मी लोक यांच्याशी मैत्री दृढ करावी. नंतर देशबंधूंशी मैत्रीभाव ठेवावा.
मानवजातीशी मैत्रीसंबंध दृढ झाल्यानंतर गाय, म्हैस इ. तिर्यंच पशु-पक्षींचा क्रम येतो. मनुष्याप्रमाणे पशूंशी सुद्धा मित्रतेचा इतका व्यवहार होऊ शकत नाही, तरी ही इथे मित्रतेचा अर्थ आहे त्यांना पीडित करू नये. दुःख देऊ नये. त्यांचे स्वाभाविक अधिकार हिरावून घेऊ नये. त्यांच्यावर क्रोध करू नये. उपाशी ठेवू नये. त्यांच्या ताकदीपेक्षा जास्त बोजा लादू नये. अशाप्रकारे त्यांच्याशी मैत्री ठेवावी.
पशु-पक्ष्यांनंतर विकलेन्द्रिय अर्थात दोन इंद्रिय असणारे जीवापासून ते चार इंद्रिय असणाऱ्या जीवांचा मैत्री भावात समावेश होतो. नंतर भूत आणि सत्त्व अर्थात वनस्पती. आणि पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू या पाच स्थावरांबद्दल मैत्री भावना असावी. अर्थात त्यांचे रक्षण करावे. इथपर्यंत मैत्रीची परिपूर्णता होते. घरापासून प्रारंभ झालेली मैत्री, जगत् मैत्री पर्वत येऊन स्थिरावते.
जसजशी आत्मविशुद्धी होत जाते तसतशी मैत्री भावना वृद्धींगत होत जाते. मैत्री वृद्धी होत राहणे हा आत्म्याचा महान गुण आहे. जेव्हा पूर्णपणे आत्माविशुद्धी होते तेव्हा मानवाची मैत्री त्रिलोक व्यापी होते.
जगातील प्रत्येक प्राणीमात्राशी मैत्री होणे आवश्यक आहे. कारण की जगात असा एक पण प्राणी नाही की ज्याच्याशी आपले पुत्र - पिता, पत्नी, आई, भाऊ-वहिणींचे नाते बांधले गेले नसेल. प्रत्येकाशी कोणत्या ना कोणत्या रूपात आपले संबंध राहिले आहेत. जगातील सर्व जीवांशी अनंत वेळा अनंत जन्मापासून आतापर्यंत व पुढे ही अनंत जन्मापर्यंत नाते जोडलेले असेल राहतील. (मोक्ष प्राप्त होईपर्यंत) मग पूर्व जन्मातील ज्यांच्याशी आपले रक्ताचे नाते होते त्यांच्याशी आज या जन्मात अमैत्री कशी ठेवावी ? हे योग्य नव्हे.
दुश्मनांशी सुद्धा अमैत्री नसावी. कारण की त्यांच्या पूर्वकृत अशुभ कर्मामुळे ते सज्जनांशी शत्रुत्व ठेवतात. त्यांच्या कर्मांच्या दोषामुळे जर आपल्या मैत्रीत बाधा येते तर आपली कमजोरी आहे. मैत्री भाव अबाधित ठेवणाऱ्यांना अशी कमजोरी शोभा देत नाही. दुष्टांशी सुद्धा मैत्री ठेवल्याने दुष्टही आपोआप मित्रता करू लागतो.
कोणाबरोबर ही शत्रुभाव ठेवणे, क्लेश करणे, द्वेष करणे, ईर्ष्या करणे हे सर्व पशुंचे गुण आहेत. मनुष्य तर उच्च कोटीचा प्राणी मानला जातो. त्यात पाशवी गुण नसावेत.