________________
(५२८)
सोमप्रभसूरींनी सिंदूर प्रकरणमध्ये म्हटले आहे
बोधीचे इतके महत्त्व समजल्यानंतर पण जो मनुष्य ह्या दुर्लभ जन्माला भोग विलासामध्ये व्यर्थ घालवतो, तो सोन्याच्या थाळीमध्ये धूळ किंवा माती भरतो, चिखलाने पाय धुण्यासाठी अमृत वाहवतो, हत्तीच्या पाठीवर इंधन वाहून नेतो आणि कावळा उडविण्यासाठी दगडाच्या जागी चिंतामणी रत्न फेकतो. ४४८
-
हे मनुष्य जन्म बोधी रत्न प्राप्त करण्यासाठी मिळाले आहे. पुण्य योगाने धन, स्वजन, सर्वकाही पुन्हा मिळू शकते पण बोधीरत्न जर एकदा हातातून निघून गेला तर पुन्हा मिळणे अत्यंत कठीण आहे. म्हणून सम्यक्त्वाचे दोष टाळून बोधीच्या नाशक तत्वाने दूर राहून आपल्या सम्यग्दर्शनाची रक्षा करा आणि पुन्हा पुन्ही चिंतन करा की बोधीरत्न मिळणे 'सुलभ नाही. हाच बोधीदुर्लभ भावनेचा सार आहे.
बोधीचे तीन प्रकार आहेत. ज्ञानबोधी, दर्शनबोधी आणि चारित्रबोधी सामान्यतः मनुष्यचे आकर्षण सुख सुविधा आणि धन संपत्तीच्या प्रती असते. पण ते दुःख रूप आहे असा अनुभव झाला असताना पण मनुष्य त्या परिस्थितीला विसरतो. बोधीदुर्लभ भावना हाच संदेश देते की ह्या जगात सुख सुविधेचे भौतिक पदार्थ मिळणे फार दुर्लभ नाही. दुर्लभ आहे मानसिक शांती. मानसिक शांती धन वैभवाने अथवा सुख सुविधेने मिळत नाही.
मनःशांती ज्ञान दर्शन चारित्र रूपी बोधी ने प्राप्त होते. बोधी प्राप्त झाल्यावर विपरीत श्रद्धा, ज्ञान व आचरण नष्ट होऊन सत्याची ज्योति प्रज्वलित होते. ती ज्योती कधी विझत नाही. असा मनुष्य अनुत्तर ज्ञानाने स्वतःला भावित करतो. धर्म भावना
धर्म शब्द अतिशय महत्त्वपूर्ण आहे. यात उत्तम भाव, तत्त्व व सत्कर्माचा एके ठिकाणी सुंदर समन्वय झाला आहे. हा संस्कृतच्या 'घृ' म्हणजे धारण करणे. या धातूपासून धर्म शब्द बनला आहे. याचा अर्थ आहे जी कार्ये जीवनात धारण करण्यासारखी आहेत, जे करण्यामुळे जीवनाची योग्य मार्गाने प्रगती व विकास होतो त्याचे आचरण करणे म्हणजे धर्म होय. जो सदाचारी, नीती, इ. वर टिकून आहे तो आहे धर्म.
जैन सैद्धांतिक दृष्टीने वस्तुच्या स्वभावाला धर्म म्हटले जाते. आत्म्याचा स्वभाव सत् चित् आनंदरूप आहे. आणि हे धर्माने प्राप्त होते. तात्पर्य हे की, बहिर्भावापन्न जीव धर्माच्या अवलंबनाने स्वभावात येतो. तो विभावांचा त्याग करतो. हिंसा, असत्य, भोग,