________________
(५३८)
करणाऱ्या अवगुणांचा त्याग इंद्रियजय यात आत्मा परिणत व्हावा. याचेचे अनुकरण करणे. संयम धर्म आहे. तात्पर्य हे आहे की, बाह्य परिवेशात संयम नाही. आत्मभावाच्या परिणमनात व स्वभावानुगत होण्यात संयम आहे.
७) तप भोग उपभोग, बासना, कषाय-क्रोध, मान माया, लोभ यांचा निग्रह करून त्यापासून अलिप्त राहणे. स्वाध्यायात अनुरक्त राहणे, आत्मभावात अनुभावित राहणे याने तपधर्म सिद्ध होतो.
कुंदकुंदाचार्यांनी तपाचे विश्लेषण जे केले आहे ते फारच महत्त्वपूर्ण आहे. सामान्यतः आपण बाह्य तपालाच फार महत्त्व देतो. आत्म्याला चिकटलेले जे बिकार आहेत त्यांना दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्नच करीत नाही, म्हणून तप म्हणजे बाह्यरूपाने दिसणारे. बाह्य क्रियातून व्यक्त होणाऱ्या तपाला तप म्हणून जाणतो. तपाचे हे स्वरूप फार सीमित आहे. जे क्रोध इ. कषायांना न जिंकता फक्त शरीराने तप करतो असा घोर तपस्वी वास्तविक तपस्वी नाही.
कुंदकुंदाचार्यांच्या कथनानुसार आत्मविकारकभावानावर अंकुश ठेवणे खरे तप आहे. आणि असे आंतरीक तप करण्यासाठी ध्यान व स्वाध्यायाची बैठक असणे अतिशय आवश्यक आहे. त्यात भावनेचे पण फार महत्त्व आहे.
"जो भावइ अप्पाण" त्यांचे हे शब्द फार महत्त्वपूर्ण आहेत. जे आत्म्याला भावित करतात - मी आत्मा आहे, अजीव (जड) नाही. या भावनेस दुसऱ्या स्वरूपात आपण एकत्वभावनाचे चिंतन म्हणू शकतो. यानेच तपाची भूमिका अलंकृत होते.
भर्तृहरींचा एक प्रसिद्ध श्लोक आहे
भोगान भुक्ता वयमेव भुक्ता तपो न तप्तं वयमेव तप्ता ।
कालीन यातो वयमेव याताः तृष्णा न जीर्णा वयमेब जीर्णा ॥ २५४
अर्थात आपण भोगांना भोगत नाही. भोगांनी आम्हाला भोगले आहे. आम्ही तपाने तापलो नाही. तपाने आम्हाला तापले. समय व्यतीत नाही झाला. आपणच व्यतीत झालो. तृष्णा भोगाची वासना जीर्ण वृद्ध नाही झाल्या. आपण जीर्ण, बृद्ध झालो.
या लोकाची दुसरी ओळ फार महत्त्वाची आहे. ही अशा लोकांना उद्देशून सांगितली आहे- जे लोक बाह्यदृष्टीने (शरीराने) घोर तप करतात. उपाशी राहतात. आतापणा घेतात. थंडी सहन करतात. परंतु त्यांच्या वृत्तीमध्ये वैराग्य, तितिक्षा, धैर्य, समत्व आणि निर्वेद नाही. त्यांना तपानेच परितप्त उत्पीडित केले.