________________
कम
(५५३)
किंचि. ४६८ असा एक धर्मच आहे जो रक्षण करतो याच्या शिवाय मनुष्याला तारणारा जगात कोणीच नाही.
धर्माचे कोणतेही स्वरूप स्वीकारले, कोणत्याही भेदोपभेदांना समजले तरी धर्माचा एकच रूप समोर येणार आणि तो म्हणजे आत्मशुद्धीचा.
धर्मभावनेच्या चिंतनात धर्माच्या शुद्धस्वरूपाचा विचार केला जातो, त्याच्या विविध साधना मार्गाने चिंतन केले जाते.
धर्मभावनेच्या चिंतनाचा लक्ष्य मानवाला मानवतेने पण उंच देवस्य अथवा अमरत्वाकडे वाटचाल करायची आहे.
ह्या दुर्गन्धयुक्त मळकट शरीराद्वारा जर स्वर्ग अथवा मोक्ष लक्ष्मी प्राप्त होत असेल तर काय नुकसान आहे ? जर देवाला चढवल्या नंतर अप्रशस्त, सुकलेल्या, कोजलेल्या, अग्राह्य फुलातून सुख प्रद रत्न मिळत असतील तर सांसारिक दृष्टीने त्याची मौलिकता समजणारा कोण त्याला लाभदायक मानणार नाही ? अर्थात निःसार वस्तू पासून सार रूप वस्तू मिळत असेल तर कोण असा मूर्ख आहे की ते ग्रहण करणार नाही ? जरी हे शरीर नाशवंत मळमूत्र युक्त आहे पण ह्या मनुष्य जन्मातच साधना आराधन करून मोक्ष लक्ष्मी प्राप्त होते.
भयंकर अंधकारात नेत्र कितीही तेजस्वी असले तरी मार्ग दिसत नाही, जो अंधकार नक्षत्राला पण झाकून देतो सर्व सुखाचा नाश करतो. परंतु सूर्य प्रकाश होताच अंधकार नष्ट होतो. त्याच प्रमाणे धर्मरूपी सूर्यचा उदय होताच जन्म-मरण, संयोगवियोग, दैहिक राग, मानसिक रोग शोक इत्यादी तत्क्षण नष्ट होतात. ४६९
ह्या लोकात धर्मसूर्याचा जो महिमा सांगितला आहे तो अत्यंत प्रभावक आहे. संसारात जन्माबरोबर मृत्यूचा जो योग आहे तो अतिशय दुःख प्रद आहे. दर्प उत्पन्न करणारा संयोग वियोगाच्या रूपात बदलतात, अनेक प्रकारचे भय ह्या जगात परिव्याप्त आहेत, स्वस्थ आणि परिपृष्ट देह मण रुग्ण होण्यात उशीर लागत नाही, अनेक प्रकारच्या चिंता, मानसिक दुःखाने मनुष्याला घेरले आहे एका नीतिकाराचा हा प्रसिद्ध ठीक आहे
उत्थाय उत्थाय बोधव्यं महेंद्र भयमुपस्थितम् ।
मरण, व्याधि, शोकानाम् किं अद्य निपनिष्यति ॥
अर्थात उठून उठून मनुष्याने विचार केला पाहिजे की माझ्यासमोर मोठे मोठे