________________
21
आत्म्याची सिद्धी करून आत्मा जड पौदगलिक नाही पण चेतना शक्तियुक्त आमदव्य आहे. हे जाणल्यानंतर अशरण भावनेत नित्य असा चेतन्य आत्मा शरण रहित कारण आहे. त्याला शरण देणारा ह्या संसारात कुणीच नाही. संसार स्वार्थ आणि पापाने
लेला आहे. संसार सार रहित असार आहे. अशा संसाराचे स्वरूप ओळखण्यासाठी निसरी भावना अर्थात संसार भावना सांगितली आहे. ह्या संसार भावनेत राग-द्वेष, विषयकपायाने भरलेल्या संसाराचे स्वरूप दाखवून आत्म्याला मोहबंधानातून सुटण्यासाठी जागृत केले आहे.
जड वस्तू आणि संसाराच्या संबंधाचे वास्तविक स्वरूप समजल्यावर स्वतःच्या सूक्ष्म स्थितीचे ज्ञान मिळवण्यासाठी चौथी आणि पाचवी एकत्व आणि अन्यत्व भावनेचे स्वरूप दाखवले आहे. मी कोण आहे ? याचा निर्णय करण्यासाठी चौथ्या व पाचव्या भावनेत सांगितले आहे की मी एकटाच आहे. एकटाच आला आणि एकटाच जाणार आहे. माझे कोणी नाही आणि मी कुणाचा नाही. माझे काहीच नाही माझे आहे ते माझ्या जवळच आहे, बाहेर नाही. बाहेरच्या वस्तू आणि व्यक्तीतून विरक्त होऊन आत प्रवेशलेला आत्मा कुठे स्वतःच्या शरीरातच आसक्त होऊ नये. देह राग आणि देहभावातच आकर्षीत होऊ नये म्हणून सहावी अशुचिभावना सांगितली आहे, की हे आत्मा ज्या देहावर तू खूप मोह ठेवतो तो देह कशा अशुचि व मळमुत्राने भरलेला आहे. दुर्गंधीत नाळ्यासारखा आहे. त्याची उत्पत्ती आणि मृत्यूच्या दुःखदायक अवस्थेचा विचार कर. अशा प्रकारे चेतावनी देणारी ही अशुची भावना आत्म्याला सावधान करते.
_ आत्मा आता विकासाच्या सातव्या पायरीवर येतो आता स्वतःच्या आत पहातो. आन्तरनिरिक्षण करतो की मिथ्यात्व, अविरती, प्रमाद, कषाय, योग, क्रिया इत्यादी आराव मार्गाद्वारे किती कर्मचोर आत्म्यात घुसले आहे आणि गुण रत्नांची लुट चालवली आहे त्याच्या पासून सावधान व्हायचे आहे.
__ मित्राप्रमाणे चांगली शिकवण देणारी आठवी संवर भावना आहे. पाच समिती, तान, गुप्ती, बावीस परिसह, दहा यतिधर्म १२ भावना आणि पाच चारित्राच्या मदतीने आत्म्यात घुसणाऱ्या कर्मचोरांना रोकणारी ही भावना आहे.
नव्या कर्माचे आगमन संवर द्वारा थांबले पण जुने कर्म पायात घुसलेल्या काट्याप्रमाणे टोचत आहे. त्यांना काढण्यासाठी नववी निर्जरा भावना आत्म्याच्या शुद्धीची पारा करते. ही भावना आई सारखी आहे. कडु औषध पाजून पण ताप उतरवण्यासारखी