________________
शकत नाही. ते बंधन जनक आहेत. पीडाकारी आहेत असे चिंतन करावे त्यामुळे सात भौतिकते बद्दल विरक्ती भाव जागृत होईल असे म्हणण्याचा त्यांचा आशय हा
की अशाश्वत, नश्वर, पदार्थाबद्दल ममत्व नसले तरच साधकाची प्रवृत्ती आत्मभावाकडे अधिक ओढली जाईल.
वारसाणुवेवखामध्ये आचार्य कुंदकुंदांची शैली वेगळी आहे ते पर पदार्थाच्या त्यागाची सहज वृत्ति स्वीकारतात जेव्हा आत्मा विभाव दशाचा त्याग करून स्वाभाविक दशेत येईल तेव्हा परभाव रूप अनित्य पदार्थ आपोआप सुटून जातील. म्हणून त्यांनी शुद्धोपयोगाच्या माध्यमाचा उपयोग करण्यास प्रेरित केले आहे.
स्वामी कार्तिकेय यांनी द्वादशान्प्रेक्षेच्या संबंधी तद्गत तथ्याचे विशेष प्रकारे विश्लेषण केले आहे जे जैनदर्शनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्व पूर्ण आहे. कर्मवाद, व्रत परंपरा, धार्मिक जीवन इ.चे तात्त्विक विश्लेषण त्यांनी केले आहे त्याचा पाठकांना फार उपयोग होईल. शैलीची प्रौढता, निरूपणाची गंभीरता, भावांची तलस्पर्शीता इत्यादी दृष्टीने हा ग्रंथ अतिशय विलक्षण आहे. भावनांशी संबंधित तात्त्विक ज्ञानाचे सूक्ष्म अध्ययन करण्याच्या दृष्टीने या ग्रंथाचे असाधारण महत्त्व आहे.
बारा भावनेचे उपसंहार करताना शतावधानी मुनी रत्नचंद्रजी लिहितात की जो भव्य जिज्ञासू प्राणी एकान्तात रिस्थर आसन लावून मन, वचन आणि कायेच्या शुद्धीपूर्वत उत्कृष्ट रुचि आणि प्रेमपूर्वक आदरभावनेने बारा भावनेद्वारा आत्मतत्वाचे चिंतन करेल त्याच्या मनातले कषायचे उग्र दोष शांत होतील आधी आणि उपाधि नष्ट होईल. दुःख दूर होतील ज्ञानरूपी दिवा प्रगट होईल आणि अभिनव आनंद मिळेल. १८२
ह्या श्लोकात ग्रंथकारांनी अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की भावनेचे आदर आणि प्रेमपूर्वक चिंतन केले पाहिजे. तसेच निकारण शुद्धी पाहिजे तर त्याच्या फल स्वरूपी कषायाची शांती इत्यादी फळ अवश्य प्राप्त होतात. भावनेचे साक्षात फळ शांती व समाधी आणि परम्परेने मोक्षाची प्राप्ती आहे.
बारा भावनेचे वर्गीकरण मुख्य दोन भागात वाटू शकू. प्रथम सहा भावना बाहेरच्या सामान्य स्थितीचे दर्शन घडवते. आणि मागच्या सहा भावना आन्तरिक स्थितीत आत्म्याच्या वेगवेगळ्या स्थितीचे ज्ञान करवते.
१२ भावना आत्मविकासाच्या प्रगतीची क्रमिक अवस्था आहे. पहिल्या अनित्य भावनेमध्ये क्षणिक, अनित्य अशा जड जगापेक्षा भिन्न अविनाशी, शाश्वत, नित्य, अजर