________________
(५५७)
आंदोलित करते. संस्कारी लोकांचे उद्बोधन संस्कारी पुरुषांच्या हृदयात एक प्रकारे जागृतीची भरती आणते. आणि ते नश्वर सुख समृद्धीमय जीवनापासून विरक्त होऊन वैराग्याच्या दिशेला स्वीकार करतात. आर्य जम्बु, धन्नासार्थवाह, शालिभद्र इत्यादी ह्याचे ज्वलंत उदाहरण आहे. ज्यांनी विपुल संपत्तीचा परित्याग करून धर्माचा पावनमार्ग स्वीकारून स्वतःचे जीवन धन्य बनवले. आणि लोकांना ह्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित
कैले ४७९
धर्माच्याच प्रभावाने सूर्य चंद्र नेहमी उदित होतात, ग्रीष्मऋतूच्या उष्णतेने संतप्त झालेल्या पृथ्वीला वेळेवर विद्युत चमकाऱ्याने युक्त मेघ पृथ्वीला शीतलता देतात. जेव्हा आई, वडील, भाऊ, बहीण इत्यादी सगळे तोंड फिरवून टाकतात. स्वतःचे सैनिक पण दीन हीन होतात. धनुष्य बाण उचलणारे हत्ती शिथिल होतात अशा विपरीत वेळी कष्टमय स्थितीत धर्मच सहायक बनतो, रक्षा करण्यात धर्मच तत्पर राहतो.
धर्म भावनेची फलश्रुती हीच आहे की आम्ही धर्माच्या या शुद्ध स्वरूपाचे चिंतन करावे. ह्या भावनेच्या विविध साधना मार्गाचे ज्ञान प्राप्त करावे आणि हे समजावे, ज्याप्रमाणे शिदोरी बरोबर घेऊन लांब प्रवासासाठी जाणारी व्यक्ती मार्गामध्ये भूक आणि तहानेने दु:खी होत नाही. त्याच प्रमाणे जी व्यक्ती धर्म साधना करून परभवामध्ये जाते तिची कर्मे अल्प राहातात. ती सुखपूर्वक परलोकाची यात्रा करते.
अबन्धुचा बन्धु, अमित्राचा मित्र व्याधि व दुःखाने पीडित लोकांच्यासाठी औषध निर्धनतेने खिन्न चित्तवाल्यासाठी धनरूप, अनाथांचे नाथ, आणि गुण रहित लोकांसाठी गुण सागर अशा प्रकारे ह्या जगात मात्र एक धर्मच सर्व प्रकारे कल्याण करणारा आहे. अरिहंतदेव द्वारा प्ररूपित धर्मच सत्य आहे. अशाप्रकारे भावनेने भावित होणारा बुद्धिमान सर्व प्रकारच्या आत्मिक आनंदाला प्राप्त करतो.
मनुष्याचे चार पुरुषार्थ सर्व विदित आहे. धर्म, अर्थ, काम व मोक्ष ह्या चार पुरुषार्थामध्ये धर्माचे प्रथम स्थान आहे म्हणून धर्माची सर्वत्र महानता स्वयंसिद्ध आहे. मनुष्य जीवन धर्मासाठी आहे आणि धर्म मनुष्य जीवनासाठी आहे. मोक्ष जीवनाचे लक्ष आहे. अर्थ व काम जीवनाचे दोन किनारे आहे. ज्याच्यामधून धर्माची सरिता प्रवाहित होते. मनुष्य जन्माची सार्थकता धर्ममय होण्यातच आहे. खरा धर्म तोच आहे ज्याच्या द्वारा अन्तश्चेतना आणि आंतरिक अल्हाद वाढतो.
धर्माच्या रहस्यला समजावे, समजून हृदयात धारण करून जे आपल्यासाठी चांगले