________________
लिहितात की "चिंतामणी रत्न, दिव्य निधि कामधेनु, कल्पवृक्ष हे सर्व धर्माच्या श्री, शोभा अथवा कान्ति-प्रकाशासमोर दीर्घकाळापर्यंत किंकर नौकरा सारखे आहे.'४७३
धर्मच गुरू, मित्र, स्वामी, बंधु अनाथाचा नाथ आणि तारणारा आहे. ४७४
धर्म शब्द फार व्यापक आहे आणि भ्रामक अर्थात गोंधळून टाकणारा पण आहे. कारण प्रत्येक मतवादी आपल्या आपल्या परंपरेला आणि सिद्धांताला धर्म म्हणतात. धर्माच्या बाह्य नावात पडून मनुष्य पथभ्रष्ट होतो. जर मार्ग चुकीचा पकडला तर कोण कठे जाईल काही सांगता येत नाही. ही मोठ्या महत्त्वाची गोष्ट आहे की मनुष्य समजतो माझ्या धर्मात जे सांगितले आहे तेच खरे आहे. आचार्य हेमचंद्र म्हणतात, अग्निशीखेने जर तिरपी गती केली असती तर जगत् भस्म झाले असते. हवे ने जर उर्ध्व गति केली असती तर प्राण्यांचे जगणे कठीण झाले असते पण तसे होत नाही ह्याचे कारण धर्म आहे. संपूर्ण जग ज्याच्या आधारावर आहे अशी ही वसुंधरा कोणाच्याही आधारावर टीकलेले नाही तिचा आधार धर्मच आहे. चंद्र, सूर्य प्रतिदिवस उदित होतात. जगावर उपकार करतात हा सर्व धर्माचा प्रभाव आहे.४७५
___ अशा प्रकारे धर्मस्वाख्यात भावनेचे चिंतन साधकाला धर्ममय सम्यक चिंतन धारे बरोबर जोडते. ज्याच्या फलस्वरूपी अंतरसामर्थ्य जागृत होतो आणि जीवन धर्ममय करण्याच्या रूपात तो प्रकट होतो.
जो पर्यंत धर्म मनामध्ये दृढतेने राहातो तो पर्यंत कुणी आपणास मारले तरी त्याचा प्रतिघात करत नाही. आणि जेव्हा धर्म मनातून निघून जातो तेव्हा पिता-पुत्र ह्यांच्यात पण परस्पर घात होताना पाहिला जातो म्हणून ह्या विश्वाचे कल्याण धर्मानेच आहे.४७६
"सकळाऽपि कला कलावताम् विकला धर्म कलांविना ।
सकले नयने वृथा यथा तनुभाजां दि कनीनीका विना ॥"४७७ संपूर्ण कलेचा कलाकार असला तरी जर एक धर्म कला नसली तर त्या कला व्यर्थ आहेत. ज्या प्रमाणे डोळे आहेत पण कीकी नसली तर वर्थ आहे. सगळे शाख वाचले पण आत्मशुद्धी अथवा जीवन शुद्धीचे सूत्र वाचल्याशिवाय सर्व वाचन व्यर्थ आहे. जीवन शुद्धीचे पाठ वाचले पण त्याला हृदयंगम केले नाही, त्याच्यावर विश्वास केला नाही तर काय फायदा ?