________________
भय विद्यमान आहेत. मृत्यू, व्याधी, शोक, इत्यादी मधून आज माझ्या समोर कोणते भय येऊन पडतील हे सांगता येत नाही.
म्हणजे हा संसार शोकप्रद आहे हा शोक समूह तेव्हाच नष्ट होईल जेव्हा जन्ममरणाने मुक्त होऊन आत्मा परमात्मत्व प्राप्त करेल. आणि ते धर्मानेच होणे शक्य आहे. जोपर्यंत मोक्षानुरूप संपूर्ण साधना सिद्ध होत नाही तो पर्यंत विपुल पुण्य योगाने स्वर्ग मिळतो आणि योग्य वेळी तीव्र साधना आराधना द्वारा मुक्ती प्राप्त होते. स्वर्ग जीवाचे अंतिम ध्येय नाही. ही साधना यात्रेचा मध्यवर्ती विश्राम धाम आहे.
धर्मभावनेमध्ये साधकाला धार्मिक जीवन बनवण्याची प्रेरणा दिली आहे तो धर्म दान, शील, तप आणि भावनारूप आहे. ४७०
जगातल्या अनेक भयाला दूर करण्यासाठी मनुष्य अनेक प्रयत्न करतो. परंतु सर्वात मोठे भय ‘भव' म्हणजे जन्ममरणाचे आहे. भव शरीराचे नाही पण जीवाचे होतात. शरीर तर इथेच नष्ट होते. आत्मा भ्रमण करतो हे भव भ्रमण दूर करण्यासाठी उपरोक्त चार प्रकारचे धर्म करणे आवश्यक आहे.
धर्म मात्र परलोकासाठीच नाही. इहलोकासाठी पण आहे. पण इहलोकाची पवित्रता असेल तर परलोक पवित्र होईल. म्हणन परिणामाच्या दृष्टीने आपण म्हणतो धर्माने परलोक सुधारतो. परलोकाचे कल्याण इहलोकाच्या कल्याणावर आधारित आहे. वास्तविक सत्य तर हे आहे की धर्माने आत्मशुद्धी होते. इहलोक, परलोक सुधारणे ही तर व्यावहारिक, भाषा आहे. काही धार्मिक लोक उभयलोकाच्या सिद्धीसाठी धर्माचे विधान करत होते त्यांचा भगवान महावीरांनी स्पष्ट विरोध केला आणि हे सांगितले की धर्म मात्र आत्मशुद्धीसाठी आहे. ह्याचा निर्जरा भावनेत उल्लेख झाला आहे.
जो धर्म श्रद्धेने जुळलेला आहे. बाह्य आकांक्षेने मुक्त आहे. पापक्रिया रहित त्यागाने अर्थात चारित्रयुक्त आहे. जीव, अजीव इत्यादी तत्व आणि षद्रव्य इत्यादी तत्त्वज्ञान रूप जल द्वारा सांसारिक तृष्णा भोगलिप्सा नष्ट करणारा आहे. आणि ज्याच्याने दोन फळ स्वर्ग आणि मोक्ष सिद्ध होतात. त्याला आत्म्यासाठी अमत तुल्य म्हटले आहे. हा धर्म वास्तविक सुखाचा भंडार आहे. जो वीतराग भाषित धर्म समजून पण इकडे तिकडे आपली बुद्धी भ्रमित करतो तो खरोखर अज्ञ आहेत. धर्माची श्रेष्ठता, प्रशस्तता आणि कल्याणकारीतेची भावना जितकी वाढेल तितकी धर्माची रुची होईल. ही रुचि गतिचा रूप घेऊन प्रगती करेल आणि धर्माच्या उंच पातळीला पोहचवेल.४७१ आचार्य शुभचन्द्र