________________
माप्ती. आणि काय गुप्तीचे तीन कुंपन बनवले पाहिजे. गुप्ती म्हणजे अशुभ निवृत्ती शिभ विचारवाणी वर्तनाची प्रवृत्ती. अशुभवाणी विचार अथवा वर्तनाने धर्मभावना सरक्षित राहू शकत नाही. उदा. शास्त्र ऐकता ऐकता इकडे तिकडे पाहिले निंदा केली तर
श्रवणाने हृदयात रममाण होणारी धर्मभावना लुप्त होते. आणि मन राग द्वेप इत्यादी बाह्य अथवा अशुभ भावात लिप्त होतो.
___धर्मभावना जीवनाला परिपूर्णता देणारी व कृतार्थ करणारी आहे. दोषमय अशांत जीवन बदलणारी आहे. उच्चतम ध्येय म्हणजे दिव्यत्वाला प्राप्त करण्याची पद्धती म्हणजे धर्म आहे.
योगीराज आनंदघनजी यांनी धर्मनाथ प्रभूच्या स्तवनामध्ये धर्माच्या स्वरूपाचे वर्णन करताना लिहिले आहे की ह्या संसारात धर्म धर्म सांगणारे अनेक लोक आहेत पण त्या धर्माच्या मर्माला, रहस्याला समजणारे फार कमी लोक आहेत जो धर्माच्या शरणी जातो त्याला कोणत्याही प्रकारचे कर्मबंध होत नाही.४६६
- या श्लोकात आनंदघनजी धार्मिक आवडंबराचा त्याग करून धर्माच्या खऱ्या तत्वाची शोध करून त्याला प्राप्त करण्याचे सांगितले आहे. पुढे ज्ञान आणि भक्तीची अभिव्यक्ती करताना लिहिले आहे की - संसारी जीव निश्चितपणे परमात्म स्वरूपच आहे पण कर्मावरणाच्या दुर्बलतेमुळे त्याला आपल्या विराट अथवा विपुल शक्तीची विस्मृती झाली आहे. आपला आत्म साक्षात्कार करण्याचा उद्यम स्वतःलाच करायचा आहे. स्वयं तीर्थंकर प्रभू पण आपल्याला काहीच देत नाही. पण त्यांच्याविशुद्ध स्वरूपाचे अनुचिंतन केल्याने आपणास फार काही सहजच प्राप्त होते. म्हणून योगीराज तीर्थंकर देवाची शरण घेण्याचे सांगतात.
_ संसाराचा विच्छेद शुद्धधर्माने होतो. ज्याचे मन धर्मात अनुरक्त होते त्याचे जीवन भोगापासून योगाकडे वळते. तेव्हा त्याच्या जीवनात करुणा, उदारता, परार्थवृत्ती, दाक्षिण्यता, अक्षुद्रता, गंभीरता, निर्लोभता अदिनता, अमात्सर्य, अभय इत्यादी गुण द्वितीयेच्या चंद्राप्रमाणे दिवसेंदिवस वाढत जातात.४६०
क्रियाकर्म हे धर्माचे बाह्य अंग आहेत त्याचे आभ्यंतर अंग क्षमा, दया, प्रेम १९णा, समता, संतोष, अतृष्णा, संवेग, निर्वेद, सर्वांप्रती आत्मतुल्य दृष्टी, आत्मतत्वाचे शान, निष्काम वृत्ती, परमात्व तत्वाच्या प्रती निश्चल प्रेम, भक्ती, शरणभाव इत्यादी आहेत.
4 आभ्यंतर अंग अचल, शाश्वत आहे. "एको ह धम्मो नरदेवताणं न जिइ अन्नमिहेह