________________
मी आजून तेथून काय काय आणले ? चोर - काहीच नाही. संताला बोलावले म विचारले की हीच तुमची काम्बळ ? संत हो. ठाणेदार म्हणाले चोर सांगतो की च्याशिवाय तिथे काहीच नव्हते मग इतक्या वस्तू तुम्हा का लिहिल्या. संत हसता ना म्हणाले हेच तर सर्वकाही आहे. थंडीत अंगावर घेतो, उन्हाळ्यात खाली आथरतो, कधी डोक्याखाली उशी म्हणून घेतो. हे एकच माझ्यासाठी सर्वस्व आहे.
धर्म जेव्हा सर्व काही होतो तेव्हा धर्माची सुगंध येते. धर्माचा संबंध बाह्य पदार्थाबरोबर नाही. धर्म आत्म्याचा गुण आहे. धर्माचे स्वरूप उदात्त, शुद्ध, आनन्दमय आहे.
सधर्मः सम्यग्दृज्ञप्तिचारित्र त्रितयात्मक:४६३ अर्थात- जो धर्म सम्यगदर्शन सम्यग्ज्ञान आणि सम्यक चारित्र्य स्वरूप आहे. तत्वार्थ सूत्राच हीच अभिव्यक्ती आहेसम्यग्दर्शनज्ञानचारित्राणि मोक्ष मार्ग.४६४
धर्माता कोणत्याही भेदोपभेदाने समजा पण धर्म आत्मशुद्धी व मोक्ष प्राप्तीचे साधन आहे. ज्याच्याने अभ्युदय आणि निःश्रेयसची सिद्धी प्राप्त होते. त्याला धर्म म्हणतात.४६५ अभ्युदय म्हणजे पौद्गलिक समृद्धी आणि निःश्रेयस म्हणजे आध्यात्मिक श्रेय. धर्माने जसे आध्यात्मिक श्रेय मिळते तसे पौदगलिक श्रेय पण धर्मानेच साध्य होते. आध्यात्मिक सुखाची सिद्धी निर्जरालक्षी धर्माने होते व पौद्गलिक सुखाची सिद्धी पुण्यलक्षी धर्माने होते.
हा धर्म कल्पवृक्ष अपूर्व आहे. अन्य प्रसिद्ध कल्पवृक्ष तर मात्र इहलोक संबंधी पोद्गलिक सुख देऊ शकतात पण धर्म कल्पवृक्ष तर स्वर्ग आणि मोक्षाचे सुख देणारे आहे.
आपल्या हृदयरूपी बागात कल्पवृक्षाच्या वेलीप्रमाणे सुंदर भावना वाढावा. हृदयात ह्या सु-आख्यात सुकथित धर्माची अहोभावाने सन्मान तथा आदराने भावना केल्याने आत्म्यामध्ये आराधनेचा जोश प्रकट होतो. ही भावना सुकृत्य रूपी वृक्षाआधारे हृदयात प्रसरते अर्थात जसजसे दान इत्यादी सत्कार्य, अहिंसादी आचार आणि जिनभक्ती इत्यादी सुदर अनुष्ठान केले जाते तसे तसे अमूल्य धर्म भावना वाढते. शेवटी हीभावना सुंदर फळ पत. अर्थात ह्या भावनेचे पुन्हा पुन्हा चिंतन केल्याने आत्मा भावित होतो. ध्यानाची शक्ता प्रकट होते त्यामुळे उच्च गुणस्थानावर पुढे जाण्याची शक्ती मिळते.
धर्म भावना हृदयातून लुप्त होऊ नये म्हणून हृदयाला तीन गुप्ती अर्थात मनगुप्ती,