________________
(५५०)
धर्म कोणत्याही जाती किंवा कोमसाठी बांधलेला नाही "मारे उसकी तलवार और धारे उसका धर्म" ह्या म्हणी अनुसार धर्माचे आचरण करण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे. मात्र एकच शर्त आहे की त्याने पाप व दोषाने दूर राहिले पाहिजे.
ज्ञानी पुरुषांचे असे सांगणे आहे की धर्माची प्रत्येक साधना आराधना भाव युक्त असायला पाहिजे.
भावना, संकल्पना किंवा कल्पना केल्याने कल्पवृक्षापासून ज्या फळाची प्राप्ती होते चिंतन केल्याने चिंतामणी द्वारा जे फळ मिळतात त्या फळा इतके अथवा त्याच्यापेक्षा पण जास्त फळ धर्माद्वारे चिंतन अथवा संकल्प न करताच प्राप्त होतात आणि त्याचा प्रमाण वचन अथवा चिंतनाने सांगू शकत नाही अर्थात ते फळ इतके महान असते. नातीत असते. ४६०
धर्माचा प्रभाव अचिन्त्य आहे. पाच इंद्रियाचे विषय सुख धनाने प्राप्त होते पण पाच इंद्रिया तर धर्मानेच मिळते ह्या शरीर आणि इंद्रियांची आसक्ती दूर करणारा पण धर्मच आहे. शरीर आणि इंद्रियानमध्ये जो लुब्ध होत नाही, त्याला मोक्ष प्राप्त होतो.
धर्माचे माहात्म्य समजून एक क्षण व्यर्थ घालण्यासारखे नाही कारण ज्या ज्या रात्री व्यतित होत आहे त्या पुन्हा येत नाही, अधर्म करणाऱ्याची रात्र निष्फळ जाते आणि धर्म करणाऱ्याची रात्र सफळ होते. ४६१
मनोबळ, कायबळ, श्रद्धा, स्वास्थ्य आणि क्षेत्र इत्यादीचा सम्यक् विचार करून हे सर्व जर व्यवस्थित असतील तर धर्माचरण करण्यात विलंब कधीच करू नये.
जोपर्यंत वृद्धावस्था पीडित करत नाही, व्याधि वाढत नाही, आणि इंद्रियांची शक्ती क्षीण होत नाही तो पर्यंत धर्माचे चांगल्याप्रकारे आचरण केले पाहिजे. ४६२
शरीर धर्माचे सर्वोत्तम साधन आहे ते स्वस्थ असले तरच शुद्ध धर्माचे पालन होऊ शकेल. बालपण, वृद्धत्व, ऋग्नत्व अथवा इंद्रियांशिथिल असल्यातर धर्माचे आचरण करणे फारच कठीण आहे. म्हणून तरुण अवस्था व स्वस्थता असते तेव्हाच धर्माराधन केले पाहिजे. ज्याने धर्माच्या मर्माला समजले आहे त्याच्यासाठी जे काही आहे ते धर्मच आहे. जसे
एका सन्तांची कांबळ चोरीत गेली त्याने रिपोर्ट लिहिताना सांगितले माझे अंथरुण, पांघरूण, उशी, रजई, काम्बळ चोरले गेले आहे. एकदा चोर पकडला गेला त्याच्याजवळ काम्बळ पण होती. ठाणेदारांनी विचारले ही काम्बळ कोणाची आहे ? चोर म्हणाला