________________
(५४८)
केले आहे. भगवती आराधनाच्या टीकाकाराने १८५२ या श्लोकात महत्त्वपूर्ण ओळ
दिली आहे
दृष्टे श्रुतेच विदिते स्मृतेच धर्मे फलागमो भवतीति मनसोः निवृत्तिच करोति
धर्माला पाहण्याने, ऐकण्याने, जाणण्याने तथा स्मरण करण्याने फलप्राप्ती किंवा लनिष्पती होते. पाहणे, ऐकणे, जाणणे, स्मरण करणे हे सर्व धर्मभावनेला परिपुष्ट आणि मट करण्याचे उपक्रम आहेत. जो धार्मिक चर्याला पाहतो, त्या संबंधी उपदेश श्रवण करतो. स्वाध्याय इ. द्वारा त्याचे ज्ञान प्राप्त करतो. प्राप्त केलेल्या ज्ञानाची स्मृती ठेवतो. तो धर्माच्या सन्निकट जातो. त्याच्या मनात धर्म वसलेला आहे. त्याची उपयोगिताचे त्याला अनुभव यायला लागतो. तो धर्माच्या संबंधी भावोंदोलित राहतो. तो मानसिक निवृत्तीच्या मार्गाला लागतो.
पाठकांना जिज्ञासूंना धर्माबद्दल उत्साहित करण्यास प्रेरित करण्याच्या हेतूने आचार्यांनी एक श्लोक लिहिला आहे- ते व्यक्ती निश्चितच धन्य आहेत. ज्यांनी जिनेंद्र देव द्वारा दर्शित समस्त दुःखाचा नाश करणाऱ्या धर्माला दृढ बुद्धी द्वारा, कोणत्याही प्रकारच्या अपेक्षा शिवाय, विशुद्ध मनाने स्वीकार केला आहे. हा श्लोक फारच सारगर्भित आहे. ग्रंथकार धर्माच्या यथार्थ लक्ष्याकडे पाठकाचे लक्ष आकृष्ट करीत आहेत. या श्लोकात जो जो निरावेक्षा-निरपेक्षा शब्द आला आहे ते हे स्पष्ट करतो की, धर्माचे आराधन करणाऱ्याला धर्म सोडून अन्य कोणतीही अपेक्षा किंवा आवश्यकता नसते. धर्माचा प्रभाव किती उत्कृष्ट आहे त्याचे ह्या श्लोकात वर्णन केले आहे
धर्मेण हण्यते व्याधिः धर्मेण हण्यते भयम् ।
धर्मेण जायते सौख्यं यतो धर्म स्ततो जयः ।।४५६ धनि व्याधि नष्ट होते, भय दूर होतो, सुख प्राप्त होते, जेथे धर्म आहे तेथे
जय आहे.
धर्म आपल्यासाठी असा उपकारक आहे की ज्याच्यामुळे आपल्या इंद्रिया मन आणि बुद्धीला दिव्य प्रकाश मिळतो. जीवनातल्या कुसंस्कारांच्या अंधकाराचा नाश होतो. ण धर्माने मन बुद्ध व इंद्रिया निर्मळ आणि बलवान होतात. अशा धर्माचे चिंतन
आवश्यक आहे कारण -
धम मंगलस्वरूप आहे. सर्व जीवांच्या प्रती दया-करुणा अर्थात अभयभावना