________________
ती देणारा आहे.४५५ या श्लोकात आचार्यांनी धर्मामुळे पूजा, सन्मान, सासनीयता, प्रियता, आणि यशस्वीता प्राप्त होते असा उल्लेख केला आहे. ते धर्माकडे मी आकष्ट व्हावे म्हणून. पण हे काही धर्माची लक्षणे नाहीत. धर्माचे आचरण करणाग
कधी अपेक्षाच करीत नाही की कोणी आपली पूजा करावी. सन्मान करावा. प्रतिष्ठा मिळावी.
धर्म तर एकमात्र शुद्धात्मभाव प्राप्त करण्याचा दृष्टीने केली जाणारी सतप्रवृत्ती आहे. परंतु साधारण मनुष्य अतिउच्च भाव समजू शकत नाहीत त्यांच्यासाठी ही भूमिका निर्माण केली जाते. त्यामुळे तरी ते धर्माभिमुख होऊन सद्धर्माला प्राप्त करू शकतील. म्हणून आचार्यांनी या सांसारीक उपलब्धिंना धर्माशी जोडून धर्माचा व्यावहारिक पक्ष प्रतिपादित केला.
या श्लोकात धर्माला सुख साध्य म्हटले आहे. अर्थात् धर्मपालन ही मानवाची सहज सुलभ क्रिया आहे. सहज पालन केले जाऊ शकते, सहजपणे आचरण केले जाऊ शकते. परंतु संसारातील लोक याच्या विपरीत वागतात, अधिकांश लोक असेच म्हणतात की धर्माचे पालन करणे अति कठीण दुष्कर कार्य आहे. ते तर तलवारीच्या धारेवर चालण्याइतके क्लेशकारी आहे. कारण त्याग आणि संयम ह्या धर्माच्या धुरा आहेत. याचे पालन करताना शारीरिक अनुकूलताकडे दुर्लक्ष केले जाते. मग धर्म सुसाध्य आहे असे कसे म्हणता येईल.
इथे आचार्य ज्या भाव भूमिकेवरून सांगत आहेत. त्यांच्या म्हणण्याचा सखोल अर्थ समजायला हवा. अगदी खोलवर जाऊन आपण विचार केला तर समजेल की एकीकडे मनुष्य फारच दुर्वल आहे, दुसरीकडे जर त्याने खरे तत्व व सत्य जाणले व त्या महिमेचा अनुभव घेतला तर या भवसागराची महाभयंकरता आणि भोगांच्या परिणामाची निरसता तो जाणतो त्याच्यासाठी धर्माचे पालन करणे फारच सरळ होऊन जाते. तो धर्माच्या आचरणातच सुख मानतो. जिथे इंद्रियाचे भोग भोगायला न मिळाल्याने लोक ते प्राप्त करण्यासाठी तडफडत असतात. त्याच सुखांना खरे धार्मिक आनंदाने ठोकर मारतात. त्याग आणि तपश्चरणाचा अवलंब करतात. कारण अध्यात्माच्या रसाचा स्वाद त्याने घेतलेला आहे. धर्ममार्गाचा अवलंब केला तरच आपला मनुष्य जन्म घेणे सफल होईल याची त्याला खात्री झालेली असते म्हणूनच आचार्यांनी वर जे सांगितले ते अगदी सत्य आहे. म्हणूनच साधकाला भावनांच्या माध्यमाने आत्मस्वरूपाचा अनुभव घेण्यासाठी दिशा