________________
व त्यांचा तो क्षय करतो. शाखात वर्णन आहे की, सम्यकदृष्टी जीव, निकृष्ट सहा बात जात नाही- ज्योतिप, व्यंतर व भवनपती देव होत नाही. कोणत्याही गतीत खी
जन्म घेत नाही. तो पाच स्थावर काय मध्ये असन्नि (मनरहित) पंचेन्द्रियात, निगोदच्या जीवात तसेच कुभोग भूमिच्या जीवात नियमतः जन्म घेत नाही.
सम्यक्त्वाच्या वर्णनानंतर ग्रंथकारांनी श्रावकाच्या स्वरूपाचे चित्रण केले आहे. जिनेश्वर देव द्वारा प्ररूपित तत्वांना जो ऐकतो तो श्रावक आहे तो द्वादश रूप (बाराव्रत) स्वीकारतो. उपसर्ग, परिषह आले तरी व्रत खंडित करीत नाही. तो हेय काय उपोदय काय हे जाणतो. पुढे शास्त्रीय उदाहरणाने ग्रंथकारांनी बारा व्रतांचे विस्ताराने वर्णन केले
आहे.
करुणा, दया, दान इत्यादींचे फारच सुंदर विश्लेपणा केले आहे. दानासंबंधी लिहिले आहे की, जो पुरुष धन-संपत्ती असूनही साधुंना शिळे, नासके अन्न देतो तो पुढील अनेकअनेक जन्मापर्यंत दरिद्र होतो. दाताचे वैशिष्टय वर्णन करताना म्हटले आहे. जो दाता, घेणाऱ्याची निंदा करीत नाही, दान देते वेळी उदास, खिन्न होत नाही. पण मनात सदभाव ठेवतो. दान करण्याची संधी मिळाली याबद्दल स्वतःला धन्य मानतो. दाता मनाच्या शुभ भावाने दान देतो. शिवाय दान देताना कोणत्याही लौकिक, फळाची अपेक्षा न ठेवता दान देतो. असा दाता विशिष्ट कोटीचा असतो.
सम्यक्त्वी श्रावकाच्या आचरणीय कर्मांचे सुद्धा ग्रंथकारांनी वर्णन केले आहे. तसेच भिक्षु, अणगार अथवा साधुंचे वर्णन केले आहे. सम्यक्त्व पूर्वक साधनेत मग्न गृहस्थ तथा मुनी, चरित्र धर्माचे अंशतः अथवा पूर्णतः पालन करतो. उत्तम क्षमा इ. दहा प्रकारचे मुनी धर्म आहेत ज्याचे पालन करताना मुनी आंतरीक सुखाचा अनुभव करतो. मग देव, मनुष्य किंवा तिर्यंच यांच्याकडून उपसर्ग (उपद्रव) सहन करताना किंचितही विचलित होत नाही.
पुढे ग्रंथकार मुनीधर्माच्या प्रत्येक भेदाचे निरूपण करतात. पुण्यबंध, पाप बंध, मंद कषाय, तीव्र कषाय इ. कर्मा संबंधी तात्त्विक विषयांची चर्चा करतात. अशाप्रकारे धर्ममय जीवनाची भावना करणे. पुन:पुनः चिंतन करणे, मोक्ष मार्गाकडे जाण्याची आकांक्षा करणारे साधक यांच्यासाठी हे एक दिव्य प्रेरणास्रोत आहेत. लखन धर्मभावनेचे लक्ष्य एकच आहे- धर्माचा महिमा, त्याचा आदर, श्रेय आणि स्वरूपाचे चिंतन कररून आराधनेत प्रवृत्त व्हावे. विविध ग्रंथात या भावनेचे विविध रूपात