________________
(५४३)
गण ज्ञानमय आहे, चेतनामय आहे. शरीरतर पुद्गलांचे बनलेले आहे.
ए तो वीतरागांना खरे देव मानतो. त्याला पूर्णपणे समजलेले असते की- सर्व प्राणीमात्रावर दया भाव असणे हाच उत्कृष्ट धर्म आहे. तो त्यांनाच आपले गुरू मानतो जे अपरिग्रही आहेत.
ज्याची दृष्टी कुत्सित असते तो मिथ्यादृष्टी राग, मोह, निद्रा विकथा इ. नी युक्त असणाऱ्यांना देव मानतो. यज्ञादिमध्ये होणाऱ्या हिंसेमध्ये धर्म मानतो, जिथे जीवांची हिंसा होते. असत्य, अब्रह्मचर्य, परिग्रहाचे पोषण होते त्यात धर्म मानतो. परंतु सम्यग्दृष्टी निश्चितपणे जाणतो की- कोणी देव देवी आपल्याला धन संपत्ती देऊ शकत नाहीत. सुख किंवा दुःख ही देऊ शकत नाहीत. जीवाचे कर्मच सुख-दुःखाचे कारण आहेत. सांसारीक लोक धनवान बनण्यासाठी देव देवी इ.ची अनेक प्रकारे आळवणी करतात. त्यासाठी योग्य काय अयोग्य काय ? न्याय काय अन्याय काय ? याचे ही त्यांना भान रहात नाही. यालाच मिथ्यादृष्टी म्हणतात. तेही इच्छा करतात की देवांनी त्यांच्या इच्छापूर्तीसाठी मदत करावी.
देवाची पूजा करतात आणि त्याच्यासमोर आपली इच्छा प्रकट करतात. परंतु सम्यक्त्वीला हे चांगल्या प्रकारे माहित आहे की, देव आपल्याला कोणत्याही प्रकारची मदत करू शकत नाही. आणि हे ही तो जाणतो की, धन-संपत्ती, सांसारीक सुख क्षणभुंगर, नश्वर आहेत.
जेव्हा मनुष्य आपला देह त्याग करतो तेव्हा त्याच्या संपत्तीतून काही सुद्धा त्याच्या बरोबर जात नाही. इथेच राहणार आहे. म्हणून तो देव-देवींच्या भ्रमात पडत नाही. तो तर आपल्या आत्म्यात लीन राहून वीतराग प्रभूच्या चरणात शरण घेतो. त्यांनाच देव मानतो. आदर्श मानतो, त्यांनी प्रदर्शित केलेल्या मार्गाचे अनुसरण करून खरी उपासना करतो. संसारातील सुख जे मिळाले आहेत ते संचित पुण्याईमुळे आणि जोपर्यंत पुण्य योग असेल तो पर्यंत ते मिळतात, पुण्य क्षीण झाले की कुठे कसे दूर होतात कळतही नाही. सम्यग्दृष्टी असणाऱ्याचे हे असे चिंतन असते. त्याला माहित आहे की, ज्या जीवाचा, ज्या देशात, ज्यावेळी ज्या विधानानुसार जन्म व मृत्यू जिनेश्वर प्रभू जाणतात त्याचप्रमाणे निश्चित तसेच होणार. यात किंचित मात्र शंका कुशंका नाही. तो हेही जाणतो की- प्रत्येक पर्याय-परिणमनाचा द्रव्य, क्षेत्र, काल तथा भाव निश्चित आहे, ज्या क्षेत्रात ज्या पदार्थाचा परिणाम होणार आहे तसेच होते. त्याला कोणीही परिवर्तित करू शकत