________________
(५४१)
इंद्रियांना ज्ञात होत नाही म्हणून त्याचे आस्तित्वच नाही. मीमांसक प्रत्यक्ष, अनुमान, उपमान, शब्द, अर्थोत्पत्ति व अभाव हे सहा प्रमाण मानतात. यातील पहिले पाच प्रमाण वस्तुचा सदभाव व आस्तित्वाला मानतात. जे ह्या पाच प्रमाणाने सिद्ध होत नाही. मग तो पदार्थच अस्तित्वात नाही. असे मानतात. त्यांच्या दृष्टीने सर्वज्ञ या पाच तत्वात बसत नाही. म्हणून सर्वज्ञ त्यांना मान्य नाही. याचे समाधान करताना टीकाकार लिहितात संसारात असे अनेक पदार्थ आहेत जे माहित नाहीत. म्हणून काय त्यांचे आस्तित्वच नाही काय ? उदा. सूक्ष्मपरमाणू ज्यांना आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही. अंतरीत पदार्थ, ज्या पदार्थांवर आवरण असेल तर तेही डोळ्यांनी दिसणार नाही, सुमेरु पर्वत जो अत्यंत दूरवर आहे. सामान्य व्यक्ती त्याला पाहू शकणार नाही. असे कित्येक पदार्थ इंद्रियगम्य नाहीत. जर सर्वज्ञ नसते तर आपल्या इंद्रियाने आपण पाहिले नसते आणि त्याबद्दलची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलीच नसती. सर्वज्ञांनी पाहिल्यामुळेच बुद्धिगम्य झाली. आणि सर्वज्ञता पण त्यामुळेच सिद्ध झाली. अशाप्रकारे टीकाकारांनी सर्वज्ञवादाचे दार्शनिक पद्धतीने टीका केली आहे. इतके वर्णन केल्यानंतर ग्रंथकारांनी श्रावकधर्म व मुनिधर्माची चर्चा केली आहे.
सम्यक्दर्शनाचे २५ दोष वर्णित केले आहेत. सम्यक्त्व, नरक, तिर्यच मनुष्य आणि देवगती या चारांना प्राप्त होऊ शकते. परंतु त्यासाठी नियम आहे की, तो भवी जीव असावा, अभविला सम्यक्त्व प्राप्त होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट अशी की, तो सन्नि (मनसहित) पंचेंद्रिय असावा, कारण असन्नि (मनरहित) प्राण्याला सम्यक्त्व प्राप्त होऊ शकत नाही. तो प्रत्येकक्षणी अनंतगुणी विशुद्धी युक्त असायला हवा. पीतलेश्या, पदमलेश्या किंवा शुक्ललेश्या यापैकी एक लेश्या त्याच्यात असायला हवी. जो जागृत आहे, निद्रा-निद्रा, प्रचलाप्रचला आणि स्त्यानगृद्धी निद्रा रहित असावा. त्याच्यात सर्व पर्याप्ती पूर्णपणे विकसित असाव्यात, तो ज्ञान व साकार उपयोगाने युक्त असावा, त्याचे जास्तीत जास्त अर्ध पुद्गल परार्वतन काळ बाकी असावे. अशा जीवाला सम्यक्त्व प्राप्त होऊ शकते. पुद्गल परावृत्त म्हणजे एखाद्या जीवाने संसारातील जितके पुल आहेत त्या पुद्गलांना कोणत्या ना कोणत्या रूपात भोगलेले असतात. त्याला पुद्गल परावर्त म्हणतात. असे अनेक अनेक पुद्गल परावर्तामध्ये चक्कर मारून मारून जेव्हा त्यांचे अंतिम पुद्गल परावर्त्ताचा अर्धा भाग बाकी राहतो अशा जीवालाच सम्यक्त्व प्राप्त होऊ शकतो.
यानंतर ग्रंथकार उपशमसम्यक्त्व आणि क्षायिक सम्यक्त्वाचे वर्णन करतात. ते