________________
(५१९)
लोकात ही गोष्ट प्रसिद्ध आहे की घोर तपस्वी महान क्रोधी असतात. धार्मिक दृष्टीने तपाचा आणि क्रोधाचा सुतराम संबंध नाही. खरं म्हणजे तपस्वीमध्ये प्रशांत भाव असायला हवा. म्हणून आचार्य कुंदकुंद म्हणतात. तपस्वीने प्रथम कपायावर तावा मिळवायला पाहिजे. ध्यानाचा अभ्यास आणि शाखांचा स्वाध्याय करायला पाहिजे. याने मन निर्मल आणि पवित्र होते. वृत्तीमध्ये ऋजुता व मृदुताचा प्रार्दुभाव होतो.
८) त्याग आचार्य कुंदकुंद त्यागा संबंधी लिहितात की, मोहाचा त्याग करून जो निर्वेद भावनेने अनुभावित होतो. त्याचा त्याग धर्म सिद्ध होतो. असे वीतराग प्रभूंनी सांगितले आहे.
याचा अर्थ हाच की कोणती ही वस्तू सोडून देणे म्हणजे त्याग नव्हे. त्या वस्तूबद्दल मनात जो ममत्व भाव, आसक्ती असते, वस्तू माझी आहे असे वाटणे त्याला सोडणे म्हणजे त्याग आहे. थोडक्यात कोणत्याही वस्तू पदार्थ व्यक्ती इ. बद्दल मनात जी आसक्ती घर करून राहते त्या भावाचे परिमार्जन म्हणजे त्याग होय. चेतन, अचेतन सर्व प्रकारच्या परिग्रहापासून निवृत्त होणे, अनासक्त होणे म्हणजे त्याग आहे जे आपलेच आहे त्याचा त्याग होत नाही. म्हणजे आत्मा चेतन्य आहे तोच आपला आहे त्याचा त्याग कसा ? चैतन्य आत्म्याचा गुण आहे. आत्मा अचेतन कधी होऊच शकत नाही. त्या आत्म्याचा त्याग कसा होणार ? जी पर वस्तू आहे आपली नाहीच त्याला काय सोडायचे ज्याच्याशी आपला संबंधच नाही. म्हणजे आपण वस्तूला सोडू शकत नाही. कारण ती आपल्यात संमिश्र झालेली नाही. त्यागवस्तुत नाही. भावनेत आहे. रागात्मक (मोह) बुद्धीने वस्तू ग्रहण करून ठेवली आहे. त्या बुद्धीचे परिवर्जन करणे त्याग आहे. कोणत्याही वस्तूशी जो तादात्म्य भाव जोडतो त्याचा त्याग करायचा, स्वला व समजणे, वस्तूला वस्तू समजणे, मी वस्तू नाही. वस्तू माझी नाही. मी आत्मा आहे. चेतन आहे. वस्तू पौद्गलिक अचेतन आहे. जड आहे. त्या वस्तूंशी माझा रागात्मक भाव (मोहात्मक भाव ) कशासाठी ? अशा प्रकारच्या भावनेचा अभ्यास केल्याने खऱ्या अर्थाने त्याग होतो.
-
९) अकिंचन्यम् या भावनेचा संबंध समस्त परिग्रहाच्या त्यागाशी आहे. ज्याच्याजवळ काही असते तो किंचन, अकिंचन त्याच्या उलट आहे. नास्ति किंचन यस्यस अकिंचन: ज्याच्याजवळ काहीच नसते तो अकिंचन असतो. अकिंचनस्य भावः अकिंचन्यम् अकिंचन्य म्हणजे सर्वथा परिग्रह शून्यता मुनींना अकिंचन म्हणतात. कारण मुनीजवळ काहीच नसते. आचार्य कुंदकुंद अकिंचन्यचा फार सूक्ष्म अर्थ सांगतात ते