________________
(५३७)
मानव आपले आध्यात्मिक वैभव व धन विसरत गेला तो खऱ्या सुखापासून वंचित होत गेला. याचे कारण अज्ञान व अश्रद्धा होय. यापासून जागृत होण्यासाठी भावना व अनुप्रेक्षाचे असाधारण महत्त्व आहे.
मुनी धर्म अकरा प्रतिमांची आराधना करणारा साधक अंतःकरणात उत्तम क्षमा, उत्तम मार्दव, उत्तम, आर्जव, उत्तम सत्य, उत्तम शौच्या, उत्तम तप, उत्तम त्याग, उत्तम अकिंचन्य आणि उत्तम ब्रह्मचर्य या दहा धर्माने युक्त मुनी धर्माचा स्वीकार करतो. ह्याला दशलक्षण मुनीधर्म म्हणतात.
दश लक्षण मुनीधर्म
१) क्षमा उत्तम क्षमाचा अर्थ, क्षमेचे श्रेष्ठतम रूप हा उत्तम शब्द केवळ चांगले किंवा श्रेष्ठ अर्थापर्यंत मर्यादित नाही. त्याचा उत्कृष्टतम असा अर्थ आहे. क्षमा उत्तम तेव्हा होते जेव्हा कठोराहून कठोर, दुःखदाहून दुःखद व्यवहार करणान्याशी पण आपल्या मनात त्याच्याबद्दल किंचितमात्र सुद्धा रोष निर्माण होत नाही. विक्षोभ होत नाही. उत्तेजित होत नाही. असे वाटत सुद्धा नाही की आपल्याला दुसह्य बोल बोलले आहेत. हे क्षमेचे लक्षण आहे.
२) मार्दव - श्रेष्ठ कुल, सुंदर रूप, उच्च जाती, तीव्र बुद्धी, दुष्कर तप, उज्ज्वल ज्ञान व शील इत्यादींचा ज्याला यत्किंचित गर्व नाही. ते या उत्तम मार्दवाचे अधिकारी आहेत.
३) आर्जव - ज्यांचे हृदय पूर्णपणे निर्मल, निर्विकार असते, जरा पण कुटिलता ज्याच्यांत नसेत, त्यास आर्जव धर्म आहे असे म्हणावे.
४ ) सत्य सत्याचे पालन करण्यासाठी कुठेही केव्हाही संताप निर्माण होईल असे वचन न बोलता मुनी स्व पर हित याचे भान ठेवून संभाषण करतात. ५) शौच शौच याचा अर्थ आहे सुचिता, पवित्रता. परंतु प्रत्यक्षात बाह्य स्वच्छता प्रक्षालनाने ही पवित्रता सिद्ध होत नाही. आकांक्षेपासून निवृत्ती आणि वैराग्य भाव याने जो संपन्न असतो त्यासच शौचता पवित्रता प्राप्त होऊ शकते.
इच्छेचा पूर्णपणे निरोध करून अंतरात्मा निराकांक्ष अथवा उज्ज्वल होऊन जाणे. चित्त वैराग्य भावनेने आप्लावित होऊन जाणे म्हणजेच सुचिता,
- व्रत व समितींचे परिपालन, दण्ड, त्याग हिंसादी आत्म्याला विकृत
६) संयम