________________
(५४६ )
वर्णन आहे. त्याचे कारण हे असावे की प्रत्येक ग्रंथकाराची आपली शैली व अभिरूची,
वेगवेगळी असावी.
आचार्य कुंदकुंदांनी बारा अनुवेक्खा ( द्वादशानुप्रेक्षा) मध्ये जिनेंद्र देव प्ररूपित, क्षमा इ. धर्माचे अनुचिंतनाचे या धर्म भावनेत विशेष प्रकारे विवेचन केले आहे. दिगंबर परंपरामध्ये दश लक्षणधर्म नावाने प्रसिद्ध आहे. ते पर्युषणाच्या दहा दिवसात एका-एका धर्माची आराधना करण्याचा विशेष प्रयत्न आणि प्रभावनामूलक समारोह आयोजित करतात. ज्यामुळे जनमानसात विशेष उत्साह जागृत व्हावा.
हे दहा धर्म कोणत्याही विशिष्ट परंपरेशी संबंधित नाहीत. सर्व जैन त्यांना मानतात. परंतु सामाजिक दृष्टीने या आधारावर दिगंबर परंपरामध्ये विशेष प्रयत्न केला गेला असावा.
स्वामी कार्तिकेयानुप्रेक्षा मध्ये धर्म भावनेच्या अन्तर्गत मुनी धर्म आणि श्रावक धर्माची विशेष चर्चा आहे. यावरून स्पष्ट होते की, स्वामी कार्तिकेयांनी जीवनाच्या व्यावहारीक पक्षाला विशेष महत्त्व दिले आहे. जेव्हा धर्म मानवजीवनात व्यवहारारूपात आचरणात येतो तेव्हा निरपवाद पालन तथा सापवाद पालन रूप अशा दोन विधा प्रकट होतात. निरपवाद व्रतपालन मुनी धर्म आहे. जिथे धर्मच जीवनसर्वस्व आहे मग ते प्राणपणाने पालन केलेच जाते. त्यात कोणताही अपवाद किंवा सूट नसते. असे धर्माचे पालन करणारे कित्येक लोक आहेत. ज्यांचे आत्मबल जबरदस्त असते.
सापवाद म्हणजे ज्या धर्म पालनात सूट आहे. हे इतके कठीण नाही तरीपण संसारात लिप्त मनुष्य त्याकडे उत्साहित होत नाही. म्हणून या भावनेत दोन्हीकडून मानसिकता आणि दृढता उत्पन्न करण्याचा प्रयास आहे.
मूलाचारात आचार्य वट्टकेरांनी जिनेश्वर प्रणित - प्रतिपादित धर्माची आराधना करण्याचे सांगितले आहे. त्याप्रमाणे अनुचिंतन करण्याची प्रेरणा दिली आहे.
भगवती आराधनामध्ये धर्मानुप्रेक्षाचे विवेचन करताना लिहिले आहे की, जो धर्म माणसासाठी अनेकानेकरूपाने कल्याणकारक आहे. म्हणजे माणसाला मानवता आणि देवत्व प्राप्त करता येते आणि याच मार्गाने शेवटी मोक्षा प्रत जाता येते. हे सर्व धर्मभावनामुळेच शक्य होते. धर्मभावना सतत मनात केल्यामुळे हृदयात त्याचे बी रूजते, ते वाढते. धर्माच्या महानतेचे वर्णन करताना आचार्य म्हणतात. जे धर्माचे आचरण करतात. ते सर्वांना पूजनीय होतात विश्वसनीय, प्रिय आणि यशस्वी होतात. धर्म मनुष्याला सुख प्रदान करणारा आहे.