________________
(५४४)
नाही. सर्वज्ञ प्रभू समस्त द्रव्य, क्षेत्र, काल भावयुक्त अवस्थांचे ज्ञाता आहेत. परंतु त्यांचे जाणणे याचा अर्थ असा नाही की प्रत्येक पर्यायाचा द्रव्य, क्षेत्र, काल भाव से बदल शकतील. फक्त जसे आहे तसेच ते जाणतात. एवढेच त्यांच्या ज्ञातापणा आहे. सर्वज्ञ प्रभूंनी सांगितले आहे की, प्रत्येक पर्यायात पूर्व पर्यायाचा क्षय होतो. आणि उत्तर पर्यायाचा उत्पाद होतो. पूर्व पर्याय उत्तर पर्यायाचे उपादान - मुख्य कारण आहे. उत्तर पर्याय तत्कारण प्रसूत कार्य आहे.
क्षेत्र,
काही लोक ह्याला नियतीवाद समजतात. म्हणून ते प्रत्येक पर्यायाचा द्रव्य, भाव तर निश्चित स्वीकारतात. परंतु काल निश्चित आहे असे मानत नाहीत. कारण नियती (निश्चितपणा ) चा स्वीकार केला तर मनुष्याच्या पुरुषार्थ करण्याला काही अर्थच उरणार नाही, परंतु त्यांचे असे हे निरूपण करणे सिद्धांताच्या प्रतिकूल आहे. वास्तविकता अशी आहे की काल अनियत असूच शकत नाही. जर काल अनियत असेल तर काललब्धिचे आस्तित्वच राहणार नाही. अशा प्रकारे जे निश्चितपणे निश्चय नयाच्या आधारे समस्त द्रव्य, समस्त पदार्थांना जाणतात, मानतात ते सम्यक्दृष्टी आहेत. जो यात संदेह करतो तो मिथ्यादृष्यी.
जो ज्ञानावरणीय कर्माच्या प्रबल उदयामुळे सर्वज्ञद्वारा निरूपित जीवादी तत्वांना जाणत नाही. पाहू शकत नाही. परंतु त्यावर विश्वास ठेवतो, श्रद्धा ठेवतो. त्याला हे मान्य आहे की सर्वज्ञ प्रभूंनी वर्णित केलेले जीवादी तत्व अत्यंत सूक्ष्म आहेत, त्याचे कोणत्याही प्रकारे खंडन करणे योग्य नाही. ते जिनेन्द्रप्रभूंची आज्ञारूप आहेत. कारण सर्वज्ञप्रभू अन्यथा, विपरीत कथन करणारच नाहीत. असे जो मानव आज्ञा सम्यक्त्वी आहे. सम्यक्त्याचा महिमा किती श्रेष्ठ आहे याचे वर्णन करताना ते म्हणतात की सम्यक्त्व समस्त योगात महायोग आहे. सम्यक्त्व समस्त ऋद्धीमध्ये महारिद्धी, उत्तमरिद्धी आहे. समस्त सिद्धी कारक आहे.
सम्यक्त्वाचे पंचवीस गुणांचे विशद रूपात वर्णन केले आहे. त्यात म्हटले आहे की, सर्वज्ञ देव द्वारा भाषित द्वादशांग श्रुत मधील एक अक्षर अथवा पद याबद्दल कोणतीही शंका उत्पन्न करू नये. जिन वचन आणि जैनदर्शनाला सत्य मानणे 'निःशंकित' नामक गुण आहे जो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
पुढे सांगितले आहे की, सम्यक्त्वी जीव अशा अशुभ कर्माचा बंध करीत नाही ज्यामुळे दुर्गती मध्ये जावे लागेल. परंतु पूर्वीच्या अनेक जन्मातील अशुभ कर्म जे बांधने