________________
बीते दसऱ्यासाठी पण करू नका. राग, द्वेष रहित वितरागी महापुरुषांनी ज्याचे आचरण कले आहे आणि ज्याला हृदयपूर्वक मानले आहे तोच धर्म आहे.
बारा भावनांची फलश्रुती बाग़ भावनाचा उपसंहार करताना आचार्य कुंदकुंद यांनी लिहिले आहे की बाग अनपेक्षा प्रतिक्रमण, आलोचना, समाधी रूप आहेत म्हणून नेहमी त्याचे अनुभावन करावे. द्या गाथेमध्ये हे स्पष्ट दिसून येते की भावनांचा व प्रतिक्रमण आदिचा गाढ संबंध आहे. कारण भावनेच्या अभ्यासानेच हे सुलभतेने सफल होतात. प्रतिक्रमण इत्यादीचा मार्मिक तथ्य समजवतांना आ. कुन्दकुन्द यांनी सांगितले आहे- जर आपली शक्ती किंवा आत्मबल व्यक्त रूपात विद्यमान असेल तर प्रतिक्रमण, प्रत्याख्यान, सामायिक, आलोचना, सहजपणे सतत होत राहतात. मनात समत्वभाव नसेल तर हे प्रतिक्रमण इत्यादी सर्व व्यवहार दृष्टीने आहेत, औपचारिक आहेत. अनादिकाळापासून आता पर्यंत ज्या पुरुषांना मुक्ती प्राप्त झाली आहे ती बारा भावनेच्या चिंतन मननाने केली आहे. त्या सर्व महापुरुषांना महान आत्म्यांना पुन्हा पुन्हा नमन आहे.४८०
आ. कुंदकुंदानी बारा भावनांचे जे विवेचन केले आहे ते अनेक दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्याचे पुन्हा पुन्हा चिंतन अनुभावन केल्याने जीवनात एक अशी चेतना जागृत होते की व्यक्ती सहजपणे सत्य आराधनेच्या मार्गावर आरूढ होतो.
या बारा भावना बुद्धिमान जनांची जिन वचना प्रतिश्रद्धा आणि भववैराग्य उत्पन्न करण्यात मदत करतात. जे जीव ह्या बाराभावनाद्वारा सदैव भावित राहतात ते समरस्त कर्माचा निःपात करतात आणि निर्मल शुद्ध बनून श्रेष्ठ मोक्षस्थान प्राप्त करतात.
आ. वट्टकेर आपली शुभकामना प्रगट करताना म्हणतात की, श्री जिनेश्वर देव ज्यांनी ध्यानाच्या माध्यमाने कर्माचा क्षय केला ज्यांनी मोक्षाची अर्गला उघडली, ज्यांनी मोहावर विजय मिळवला, ज्यांनी अज्ञान अंधकार मिथ्यात्व मोहनीय रज-ज्ञानावरणीयादि कर्माचा विनाश केला. ते महापुरुष या संसाररूपी समुद्रातून आम्हाला शीघ्र पार करावे. शेवटी अत्यंत सरळ भावनेने आचार्य लिहितात माझ्या जीवनात निर्मळ अनुप्रेक्षा उदित होवो, अंतिम क्षणी माझे चिंतन असेच राहो. समग्र लोकातील परमात्मा माझ्यावर प्रसन्न होण्याची कृपा करा.४८१
आ. वट्टकेर यांनी बारा अनुप्रेक्षेचे वर्णन करताना मुख्यतः या गोष्टीवर विशेष ध्यान दिले आहे की साधक आत्मा विपरीत पर पदार्थ जे अनित्य आहे ते कधीच शरणरूप