________________
(५६२)
अध्यात्म योगात गती करू शकत नाही. त्याची संपूर्ण गती प्रगती वैराग्याच्या दृद्धतेवरच
अवलंबित आहे.
बारा भावनेच्या चिंतनाने वैराग्य भाव दृढ होतो त्याच बरोबर यथार्थतेची अनुभूति होते. अनादिकाळच्या मिथ्या संस्काराचे परिमार्जन होते.
वैराग्यभावना सुखाची चावी आहे. संसार भययुक्त आहे व वैराग्य भावना अभय आहे. भव्य जीवांना आनंद देणारी आहे.
परिसह, उपसर्ग आले असता वैराग्य भावनेच्या चिंतनाने दृढता आणि समता भावरूपी सुख उत्पन्न होते जेथे वैराग्य तेथे सुखसमुद्राला भरती येते.