________________
(५४९)
धर्म आहे. धर्म हे मोक्ष सुख मिळवण्याचे साधन आहे, धर्माने सांसारिक भयाचे निवारण
होते असा धर्म जगाचा आधार रूप आहे. ४५७
धर्माचे कल्याकारी दोहे खूप सरळ भाषेत आहे
धर्म सदा मंगल करे, धर्म करे कल्याण |
धर्म सदा रक्षा करे धर्म बड़ा बलवान ॥ सदाचरण ही धर्म है, दुराचरण ही पाप ।
सदाचरण सुख ही जगे, दुराचरण दुःख ताप ॥
धर्म धार निर्मळ बने, राजा हो या रंक ।
रोग, शोक, चिंता मिटे, निर्भय होय निश्शंक ॥ ४५८
जो धर्म संपूर्ण रिद्धि, दिव्यसिद्धी आणि आत्मशुद्धी देणारा आहे त्याचे तत्वबुद्धिने चिंतन केले पाहिजे. त्या चिंतनात कोणत्याही प्रकारचा पक्षपात नसावा. जगात प्राप्त करण्यायोग्य तीनच वस्तू आहेत ऋद्धि सिद्धि आणि शुद्धी.
ऋद्धित मानवीय आणि दिव्य सर्व वैभवाचा समावेश होतो. सिद्धित अणिमा, गरिमा इत्यादी विभूतींचा जंघाचरण विद्याचरण इत्यादी लब्धिंचा आणि चमत्कारीक शक्तीचा समावेश होतो. शुद्धी कर्माचे आवरण दूर झाल्यावर जी आत्म विशुद्धी होते ती. ऋद्धि संसारी जीवांच्या इच्छेचा विषय आहे. सिद्धि योगि महर्षीच्या इच्छेचा विषय आहे. तेव्हा सिद्धि जिज्ञासु मुमुक्षू जीवांना स्पृहनीय आहे.
साधारणतः जगाच्या प्रत्येक प्रवृत्तीच्या मागे ह्या तिन्हीमधून कोणतेही एक प्राप्त करण्याचा लक्ष्य असतो. ह्याच्या साठीच लोक धावपळ करतात, देशोदेशी भटकतात. ह्या तिन्हींना मिळवण्याचे मुख्य साधन धर्मच आहे. धर्मामुळे इतके मधूर व विशालफळ प्राप्त होतात म्हणूनच धर्मभावनेचे चिंतन महत्त्वपूर्ण आहे.
जोधर्म राग द्वेष विरहित, कीर्ति गौरव अथवा प्रतिष्ठा मिळवण्याची स्वार्थवृत्ती रहित, मी सांगतो तेच सत्य असा दुराग्रह अथवा ममत्व रहित आहे व मात्र लोकोपचारासाठी प्ररुपित जो धर्म आहे तोच धर्म सत्य पथ्य आणि हितावह अथवा श्रेष्ठ
आहे.
दुर्गतिच्या विहिरित पडणाऱ्या प्राण्यांना वाचचन्यासाठी व त्याच्या उन्नतीसाठी आधारभूत एक मात्र धर्मच आहे. ४५९