________________
(५४२)
साहितात- सात प्रकृतींच्या उपशममुळे उपशम सम्यक्त्वाची प्राप्ती होती. १) मिथ्यात्व,
सम्यक मिथ्यात्व, ३) सम्यक्त्व, अनंतानुबंधी ४) क्रोध, ५) मान, ६) माया, ७) लोभ ह्या सात प्रकृती आहेत.
उपशम म्हणजे पूर्णपणे नष्ट होणे नाही. तर कोण्याएका प्रकृतीने आत्म्यात प्रवेश केला तर त्याला उपशांत करायचे (समजपूर्वक) ज्याप्रमाणे पाण्यात तुरटी फिरवली की त्यातील धूळ कण खाली तळाला जाऊन साचतात. त्याचप्रमाणे उपशम सम्यक्त्वामध्ये मिथ्यात्व उपशांत होतो. क्षायिक सम्यक्त्व म्हणजे प्रतिपक्षी कर्म नष्ट झाल्यामुळे आत्म्याचा सम्यक्त्व गुण प्रकट होतो. सम्यक्त्व आत्म्याचा स्वभाव आहे. आत्मा जोपर्यंत कर्माच्या आवरणाखाली दबलेला असतो तोपर्यंत त्याचे खरे स्वरूप सम्यक्त्व प्रकट होऊ शकत नाही. सम्यक्त्वाचा तिसरा भेद आहे- क्षायोपक्षमिक, क्षय आणि उपशमाचे सम्मिलित रूप म्हणजे क्षायोपक्षम आहे. कर्मांच्या काही प्रकृतीचा क्षय आणि काहींचा उपशम झाल्यामुळे जे सम्यक्त्व प्राप्त होते त्यास क्षायोपक्षमिक सम्यक्त्व म्हटले जाते. त्यास वेदक सम्यक्त्व पण म्हटले जाते. सम्यक दृष्टी जोपर्यंत व्रत स्वीकार करत नाही तोपर्यंत अव्रत सम्यग्दृष्टी म्हटला जातो. अशा स्थितीत जरी तो भोगात आसक्त राहतो, परंतु त्याला एवढी समज आलेली असते की मी जे हे काही करीत आहे- भोग भोगत आहे ते बरोबर नाही, योग्य नाही. हे मोहनीय कर्माचे चक्र आहे. माझा (आत्म्याचा) हा स्वभाव नाही. हा विपरीत भाव आहे. यापासून अलिप्त रहायला पाहिजे. कर्माच्या वशीभूत असल्यामुळे सम्यकदृष्टीजीव त्यांचा त्याग करण्यास असमर्थ होतो. आणि त्यामुळे पश्चातापाने दग्ध होतो.
___ उत्तम व श्रेष्ठ गुणांना जो ग्रहण करतो त्यासाठी सतत प्रयत्नशील राहतो तो खरा उत्तम सम्यक्त्वी. असा गुणग्राहक सम्यक्त्वी जीव- श्रेष्ठ साधुंचा विनय करतो. साधार्मिकांच्या प्रती विनयभाव ठेवतो. साधार्मिक व्यक्तींबद्दल अनुराग, प्रेमभाव ठेवतो. तो सम्यग्दर्शन, ज्ञान, चारित्र, तप इ. अंगिकार करण्यास सतत प्रयत्नशील राहतो. ते प्राप्त करण्यास त्याची आंतरीक रुची जागृत असते. त्याला त्याचे पूर्ण भान आहे कीजीव या देहात रमतो आहे. परंतु तो या देहापासून वेगळा आहे. शरीरापासून कपडे वेगळे असतात त्याचप्रमाणे आत्मा शरीराहून वेगळा आहे. जीव आणि शरीर दूधात पाणी मिसळल्याप्रमाणे एक झाले आहेत. म्हणून अज्ञानी जीव शरीर आणि आत्मा यांना एकच मानतो. परंतु सम्यग्दृष्टी मात्र दोघांचे आस्तित्व भिन्न आहे आहे असेच मानतो. जीवाचा