________________
णतात- जो मुनी नि:संग आसक्ती रहित होऊन सुखद-दुःखद कर्मजन्य परिणामांना निग्रहित-नियंत्रित करतो. निर्द्वन्द राहतो. त्याचा अकिंचन्य धर्म सिद्ध होतो. मात्र बाह्य पदार्थांना सोडून देण्यामुळे कोणी अकिंचन होऊ शकत नाही. जर पदार्थाशी त्याचे मन गंतलेले असेल तर तो अकिंचन किंवा अपरिग्रही होऊ शकत नाही.
१०) ब्रह्मचर्य - शेवटी ब्रह्मचर्याचे वर्णन केले आहे. पुढे म्हटले आहे की जो श्रावक धर्माच्या पुढे जाऊन मुनीधर्मात यति धर्मात प्रवृत्त होतो त्यामुळे त्यास मोक्षाची अवश्य प्राप्ती होते. असेच सतत चिंतन करावे.
निश्चयनयाच्या दृष्टीने जीव-सागर धर्म-गृहस्थ धर्म व अणगार धर्म मुनी धर्माहृन सर्वथा भिन्न अहे. दोन्ही धर्मात माध्यस्थ भाव ठेवून आत्म्याचे चिंतन करावे.
__ आचार्य कुंदकुंदांच्या मतानुसार शुद्ध आत्मभावाचे चिंतन करणे हाच खरा धर्म आहे. ते- 'वत्थु सहावो धम्मो' वस्तुच्या स्वभावाला धर्म म्हणतात. या सिद्धांतावर विश्वास ठेवला आहे म्हणन ते शद्ध आत्म स्वरूपाबद्दल असे म्हणतात. गहस्थधर्म आणि मनीधर्म व्यावहारीक आहेत. हे सिद्ध होते. कारण या धर्माचा बाह्यजीवनाशी संबंध आहे. म्हणून आचार्य कुंदकुंद पुढे असेही म्हणतात की या दोन्ही धर्माबद्दल माध्यस्थ भाव ठेवला पाहिजे.
दोन्ही धर्माबद्दल माध्यस्थ भाव ठेवण्यामागे आचार्य कुंदकुंदाचा उद्देश्य आहे की 'मी श्रमणोपासक आहे', 'अमुक व्यक्ती महाव्रताराधक आहेत' इ. मध्ये थोडीशी सुद्धा आसक्ति ठेवू नये. मध्यस्थ किंवा उदासीन रहावे. यामुळे आत्म्याच्या शुद्ध स्वरूपात रमण करण्यास समर्थ बनू शकाल.
कार्तिकेयानुप्रेक्षामध्ये श्लोक ३०२ ते ४९१ पर्यंत धर्मानुप्रेक्षाचे वर्णन आहे. स्वामी कार्तिकेयांनी धर्म भावनेच्या सुरवातीला धर्माचे मूळ उपदेष्टा वीतरागदेवाचे स्वरूप वर्णन करताना म्हटले आहे की, जो त्रिकालवर्ती वर्तमान, भूत, भविष्य काळाशी संबद्ध, प्रयोजन मुक्त संपूर्ण लोकालोक प्रत्यक्ष पाहतात. ते सर्वज्ञ प्रभू होय. जर ते नसते तर अतिन्द्रिय अर्थात इंद्रिय द्वारा अज्ञ पदार्थांना कोणी जाणले असते ? कारण इंद्रियजन्य ज्ञान तर समस्त स्थूल पर्यायांना सुद्धा जाणू शकत नाही. मग सूक्ष्म पर्यायांना जाणणे अशक्यच !
या श्लोकात टीकाकार आचार्य शुभचंद्रांनी सर्वज्ञवादाची चर्चा केली आहे. त्यांनी लिहिले आहे, चार्वाक व मीमांसक सर्वज्ञांचे आस्तित्व स्वीकार करीत नाहीत. चार्वाकाच्या मतानुसार तर जे इंद्रियांना दिसते तेवढेच सत्य आहे प्रमाण आहे. ज्यांना आपण आपल्या इंद्रियांनी पाहू शकत नाही अशी कोणती वस्तूच नाही. चार्वाकचे म्हणणे आहे की सर्वज्ञ