________________
११) श्रमणभूत प्रतिमा - सर्व प्रतिमामध्ये विधान आहे की वरील सर्व प्रतिमांचे पालन करणारा साधक आपले जीवन श्रमण किंवा साधूप्रमाणे व्यतीत करतो. तो साधूप्रमाणेच सर्व क्रिया यत्नापूर्वक करतो. डोक्याचे केस वस्ताऱ्याने किंवा सहनशीलता, क्षमता असेल तर केसांचे लोचन (हाताने केस उपटून) करतो.
साधुप्रमाणे तो भिक्षा मागून उदरनिर्वाह करतो. भिक्षा मागण्यात साधूमध्ये व साधकामध्ये फरक आहे. साधू कोणच्याही घरी भिक्षेसाठी जाऊ शकतात. परंतु श्रमणभूत प्रतिमाधारी उपासक आपल्या कुटुंबातील लोकांच्या घरीच भिक्षेसाठी जातो. कारण त्याचे रागमय संबंध पूर्णपणे नष्ट झालेले नाहीत. किंवा लज्जा परिषह त्याने पूर्णपणे जिंकलेले
नसते.
या प्रतिमेचे नाव श्रमणभूत यासाठीच आहे. कारण उपासक त्यात पूर्णतः श्रमण नसतो. श्रमण-प्रवज्या स्वीकारलेली नसते. तो फक्त श्रमण-सदृश असतो.
दिगंबर परंपरामध्ये अकरावी अनुदिष्ट आहार प्रतिमा आहे. उपासक, मुद्दाम त्याच्यासाठी तयार केलेला आहार घेत नाही. याचे दोन भेद आहेत. १) शल्लक) ऐलक शुल्लक आणि ऐलक या भूमिकेतून गेल्यानंतरच मुनी दिक्षा दिली जाते.
____ भावना आणि प्रतिमा यात सामंजस्य - आपण जर बारकाईने विचार केला तर प्रतिमांच्या आराधनेचा क्रमयुक्त विकास, विशिष्ट प्रकारच्या अभ्यासाशी संबंधित आहे. या अभ्यासामागे भावना अथवा अनुप्रेक्षाचे अत्यंत महत्त्व आहे. आपण पहिली प्रतिमा, दर्शन-प्रतिमाचे उदा. पाहू या. आत्मोत्थानचे मूळ सम्यक्त्व आहे. हे प्राप्त करण्यासाठी भावनेचा अभ्यास करण्याची नितांत आवश्यकता आहे. म्हणूनच बोधीदुर्लभच्या दृष्टीने १२ भावनात याच्या चिंतनाला महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. बोधी प्राप्त होणे किती दुर्लभ व कठीण आहे त्याचे महत्त्व गौरव जेव्हा मानवाला समजते तेव्हा त्याच्या मनात एक आंदोलन सुरू होते. तो विचारमग्न होतो की आपले हे अमूल्य जीवन व्यर्थ व्यतीत होऊ नये. त्याची बहिर्मुखी दृष्टी अंतर्मुखी बनते. त्याची मिथ्यात्वाची ग्रंथी शिथिल सैल होते. आत्मज्योतीचा आभास होऊ लागतो. दृष्टीत परिवर्तन होऊ लागते. असत्याकडे झुकलेला अंतरभाव सत्याशी जोडला जातो. खऱ्या अर्थाने धर्माच्या स्वरूपावर गाढ श्रद्धा बसते. वीतराग महापुरुषाबद्दल श्रद्धा निर्माण होते. पूज्यत्व भाव जागृत होतो.
धर्माचा मार्ग दाखवणाऱ्या महापुरुषावद्दल, वीतरागी महापुरुषाबद्दल, गुरुत्वभाव त्याच्या अंत:करणात निर्माण होतो.