________________
तिथीला उपवास युक्त पौषधाचे पूर्णपणे पालन करतो. हे आत्मोन्मुखताच्या दृष्टीने खूप योग्य मार्ग आहे.
या आराधनेचा कालावधी चार महिन्याचा आहे. इथे हे जाणणे आवश्यक आहे की. ज्या प्रतिमेत साधक आराधनाशील असतो. तेव्हा दुसऱ्या (अन्य) प्रतिमेचे नियम सहजत पालन करण्या योग्य आहेत अर्थात चौथी प्रतिमेचा आराधक असेल तर तो दूसरी तिसरी प्रतिमांच्या नियमांचे सहजपणे पालन करील. परंतु चौथी प्रतिमेच्या नियमांची आराधना विशेष रूपाने करतो.
५) कायोत्सर्ग प्रतिमा - श्वेतांबर परंपरामध्ये पाचवी कायोत्सर्ग प्रतिमा आहे. कायोत्सर्ग शब्द काय+उत्सर्ग असा बनला आहे. काय म्हणजे शरीर, उत्सर्ग म्हणजे त्याग. जोपर्यंत आयुष्य आहे तो पर्यंत शरीर राहणारच. त्याचा त्याग शक्य नाही. इथे त्यागाचा अर्थ आहे. शरीरावर असलेल्या ममत्वभावाचा त्याग करणे. कायोत्सर्गात उपासक शरीर, वस्त्र इ. बाह्य पदार्थावरील लक्ष काढून आत्म्याकडे अभिमुख होतो. अष्टमी, चतुर्दशीच्या दिवशी कायोत्सर्ग, ध्यान करतो. या प्रतिमेत रात्री भोजन त्याज्य आहे. दिवसा ब्रह्मचर्य व्रताचे पालन केले जाते. रात्रीमध्ये अब्रह्मचर्यचा परिणाम केला जातो. कायोत्सर्ग प्रतिमाचा कालावधी एक दिवस, दोन दिवस अथवा तीन दिवसापासून पाच महिन्यापर्यंतचा आहे.
दिगंबर परंपरेत पाचवी सचित्त त्याग प्रतिमा आहे. त्यात सचित पाणी तसेच हिरवी वनस्पतीच्या विराधनेचे परिवर्जन करावे.
६) ब्रह्मचर्य प्रतिमा - श्वेताबंर परंपरेत सहावी प्रतिमा ब्रह्मचर्य आहे. यात ब्रह्मचर्याचे पूर्णपणे पालन केले जाते. स्त्रियांशी अनावश्यक संपर्क, वार्तालाप त्यांचे श्रृंगार, विलासादीचे अवलोकन करणे पूर्णतः वर्ण्य आहे. उपासकाने स्वतः सुद्धा शृंगार करणे, बाह्य प्रदर्शनयुक्त वेशभूषा इ. पासून दूर रहावे. या प्रतिमेत उपासक सचित आहागचा प्रत्याख्यान करीत नाही. परंतु कारणवश सचित आहार सेवन करू शकतो. या प्रतिमेच्या आराधकाचा कालावधी कमीतकमी एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस, जास्तीत जास्त सहा महिने पर्यंतची असते. यात आजीवन ब्रह्मचर्य पालनाचा पण संकेत आहे.
___ दिगंबर परंपरेत रात्री भोजन त्याग, सहावी प्रतिमा आहे. यात रात्रीचे भोजन करणे तसेच रात्री शिजवलेले अन्न सेवन करण्याचा निषेध आहे. तसेच कुशील सेवनाचा परित्याग सांगितला आहे.
७) सचित्ताहार वर्जन - श्वेतांबर परंपरेत सातवी सचित्ताहार वर्जन प्रतिमा