________________
राश
वरील अकरा प्रतिमा दिगंबर परंपरानुसार मान्य आहेत. श्वेतांबर परंपरेमध्ये खालील प्रतिमा आहेत -
१) दर्शन २) व्रत ३) सामायिक ४) पौषध ५) कायोत्सर्ग ६) ब्रह्मचर्य ७) सचित्ताहार वर्जन ८) स्वयं आरंभ वर्जन ९) भृतकप्रेष्य आरंभ वर्जन १०) उद्दिष्ट वर्जन ११) श्रमणभूत प्रतिमा.
श्वेताबर तथा दिगंबर परंपरातील प्रतिमांची तुलना
१) दर्शन प्रतिमा - प्रथम प्रतिमाचे नाव दोन्ही परंपरामध्ये एकच आहे. त्याचा संबंध सम्यकदर्शनाशी आहे. वास्तविक एक जैन उपासक सम्यकदृष्टी असतो. परंतु या प्रतिमामुळे तो सम्यक् दर्शन किंवा सम्यकदृष्टीची विशिष्ट आराधना करतो. त्यात अत्यंत स्थिरता येण्यासाठी देव, गुरू, धर्मावर आपली आस्था अत्यंत दृढ करतो. आणि त्या दृष्टीनेच चिंतन, मनन करतो. सम्यक्त्वमध्ये अतिचार लागत नाही. तो शंका, संदेह,
आकांक्षा, अनुचित अभिप्सा इ. ने बद्ध होत नाही. तो आपल्या धार्मिक विश्वासात इतका दृढ असतो की वेगवेगळ्या धर्मसंप्रदाय, मतमतांतराना जाणण्यापुरते जाणतो पण तिकडे आकृष्ट होत नाही. आपली निष्ठा खूपच निर्मळ, स्वच्छ, दृढ ठेवतो. दर्शन प्रतिमाच्या आराधनेचा काळ एकमहिना स्वीकृत आहे.
२) व्रतप्रतिमा - दर्शन प्रतिमाची आराधना केल्यानंतर उपासक व्रत प्रतिमाचा स्वीकार करतो. त्यात पाच अणुव्रत, तीन गुणवत, चार शिक्षाव्रत यांचा स्वीकार करतो.
___ या बारा व्रतामध्ये सामायिक आणि देशावकासचा यथाविधी पूर्णपणे पालन करू शकत नाही. तो करुणा, अनुकंपा इ. गुणांनी युक्त असतो.
___ या प्रतिमेचा कालावधी दोन महिने असतो. र ३) सामायिक प्रतिमा - सम्यगदर्शन व व्रतांच्या साधनेत अग्रसर श्रावक रोज सकाळी, दुपारी व संध्याकाळी तीन काल (त्रिकाल) सामायिक करतो. सामायिकाच्या बरोबर देशावकासिक व्रताचे सुद्धा चांगल्याप्रकारे पालन करतो. तो सामायिक व्रताच्या उपासनेत तन्मय एवं जागरुक राहण्याचा प्रयत्न करतो. सामायिक प्रतिमाचा कालावधी तीन महिने आहे.
४) पौषधोपवास प्रतिमा - प्रथम, द्वितीय, तृतीय प्रतिमा द्वारा उत्तरोत्तर प्रगती करता-करता उपासक पौषधोपवास प्रतिमेचा स्वीकार करतो. तो अष्टमी, चतुर्दशी, इ.