________________
आणि अती कल्याणरूप धर्म प्रसार केला, उपदेश दिला. म्हणूनच तर आपणच धर्माचे
खरे नायक आहात.
संसाररूपी प्रज्वलित अग्नीला शांत करून, निम्बार्थ करुणार्द्र होऊन धर्म रूपी मेघाच्या धारा प्रवाहीत केल्या. तो धर्म देशविरती आणि सर्वविरती. अशा दोन प्रकारचा आहे.
- गृहरस्थावस्थेमध्ये सुद्धा धर्मप्राप्तीचा लाभ चांगल्या त-हेने प्राप्त होऊ शकतो. गृहस्थावस्थेमध्ये सुद्धा यथार्थ पुरुषार्थ केला तर याच काळात, याच क्षेत्रात एक भव अवतारी बनू शकतो. अशाप्रकारे संसारसागरातून तारणारे सद्धर्माचा उपदेश देणारे, ज्ञानी पुरुषांनी भव्य जीवांच्या हृदयांधकारात प्रकाश पसरविला आहे.
आत्मविकासाचे मर्म प्रकट करणारे, कर्माचा संहार करणारे धर्मरूपी चन्द्र सतत शीतलता पसरवितात.
कुंदकुंदाचार्य द्वारा लिखित वारसाणुवेक्खामध्ये ६८ व्या गाथापासून ८२ व्या गाथेपर्यंत धर्मानुप्रेक्षेचे वर्णन केले आहे. धर्माचे दोन प्रकार - १) सागार धर्म २) अणगार धर्म. सागारधर्म म्हणजे गृहस्थधर्म आणि अणगारधर्म म्हणजे मुनिधर्म, संस्कृतमध्ये अगार, आगार दोन्ही शब्द गृहवाचक आहेत.
___ गृह घरात अर्थात गृहस्थावस्थेत पालन केल्या जाणाऱ्या धर्मास सागारधर्म म्हटले जाते. मुनी तर गृहत्यागी असतात. म्हणून त्यांचा धर्म अणगार धर्म आहे. संस्कृतातील अनगार शब्दाचे प्राकृत रूप अणगार आहे. प्राकृतमध्ये 'न' चा 'ण' होतो.
१. दर्शन, २) व्रत, ३) सामायिक, ४) पौषध ५) सचितत्याग ६) रात्रीभोजन त्याग ७) ब्रह्मचर्य ८) आरंभत्याग ९) परिग्रह त्याग १०) अनुमति त्याग ११) उद्दिष्ट त्याग. हे सागार धर्माचे अकरा भेद आहेत. यांनाच श्रावकाच्या "अकरा प्रतिमा' म्हटले जाते. को जेव्हा सम्यकदृष्टी व्यक्तीला ज्ञान आणि विरती वैराग्याची शक्ती, आत्मोत्साह प्राप्त होतो तेव्हा संमयाचा अंश मात्र तरी प्रकट झाल्याशिवाय रहात नाही. अर्थात ते यत् किंचित रूपात का असेना प्रकट होतेच. जेव्हा त्याला बाह्य रूपाने नियम अथवा प्रतिज्ञा द्वारा परिबद्ध केले जाते तेव्हा त्यास प्रतिमा म्हटले जाते. प्राकृतामध्ये पडिमा आणि संस्कृतात 'प्रतिमा' म्हणतात.