________________
भाडे या प्रतिमेत उपासक ब्रह्मचर्याचे पूर्णत: पालन करतो तसेच सचित्ताहाराचा सर्वथा व्याख्यान करतो. यात आरंभाचा प्रव्याख्यान नसतो. या प्रतिमेचा आराधना कालावधी उत्कृष्ट सात महिन्याचा आहे.
सन दिगंबर परंपरेत सातवी ब्रह्मचर्य प्रतिमा आहे. यात सर्वथाप्रकारे अतिउत्कष्टपणे दाचर्याचे पालन केले जाते. कामवासनेचा सर्वथा परित्याग करण्याचा प्रयास केला जातो.
८) स्वयं आरंभ वर्जन प्रतिमा - या प्रतिमेत साधक स्वतः आरंभ समारंभ किंवा हिंसा कार्य करीत नाही. यात एवढाच अपवाद आहे की आजीविका चालवण्याच्यासाठी इतरांकडून आरंभ करू शकतो. तसे करायला लावण्याचा त्याला त्याग नसतो. या प्रकारच्या आराधनेचा कालावधी कमीत कमी एक, दोन किंवा तीन दिवस अथवा जास्तीत जास्त आठ महिन्याचा आहे.
दिगंबर परंपरेत सद्धा या प्रतिमेत आरंभ त्यागाचे विधान आहे. उपासक घर गृहस्थीचे सर्व कार्य सोडून देतो.
. ९) भृतकप्रेष्यारंभ वर्जन प्रतिमा - उपासक या प्रतिमेत स्वतः आरंभ करीत नाही. नोकर, सेवक इ. कडून आपल्यासाठी आरंभ समारंभ करवून घेत नाही. परंतु अन्य कोणाला आरंभ करण्याची अनुमती देण्याचे प्रत्याख्यान नसते. तो आराधनेचा कालावधी कमीतकमी एक-दोन-तीन दिवस त्या जास्तीत जास्त नऊ महिनेपर्यंतचा असतो.
दिगंबर परंपरेत या प्रतिमेत साधक आवास दृष्टीने स्वत:ला अगदी संकुचित करून टाकतो. एकांतामध्ये राहण्याचाच प्रयत्न करतो. घरातल्या पुढच्या भागात सुद्धा येऊन बसत नाही. घरात एकांतात आपली साधना करीत राहतो.
१०) उद्देश्य त्याग प्रतिमा - उपासक यात आपल्या निमित्ताने बनवलेल्या भोजनाचा परित्याग करतो. तो आपल्या स्वतःला सांसारिक कार्यापासून दूर ठेवतो. तो कोणत्याही लौकिक कार्याची आज्ञा अथवा समंती पण देत नाही. कोणी विचारले तर अगदी मोजक्या शब्दात उत्तर देतो. या प्रतिमेत साधक वस्ताऱ्याने केस कापतो. कोणी शिखा (शेंडी) ठेवतात.
___ या आराधनेचा कालावधी एक-दोन-तीन दिवस किंवा जास्तीत जास्त १० महिने असतो.
दिगंबर परंपरेत ही प्रतिमा जवळजवळ वरील प्रमाणेच आहे.