________________
(५३६ )
त्याला समजू लागते की, आत्मरूपाने मी एकटा आहे. हीच ती एकत्वभावना एकत्वभावनेने अनुप्रणित झाल्याने बाह्य भौतिक पदार्थांपासून दूर राहतो.
स्वजन, नातलग, पारिवारिक संबंध इ. शी जुडलेला मोह कमी होऊ लागतो. आत्मा आपला खरा सहयोगी आहे बाकी सर्व स्वार्थ, ममत्वाचे संबंध आहे ही खरी समज त्याच्यात जागृत होते. हा उज्ज्वल भाव पुढे अधिक प्रगतीशील होऊ लागतो. संसाराचा सूक्ष्मपणे विचार करताना त्याच्या लक्षात येते की या विशाल जगात त्याचे स्वतःचे स्थान कितीसे ? लोकभावनेच्या लहरी त्याच्या हृदयात तरंगित होतात. जेव्हा तो आपल्या (आत्म्याच्या) स्वभावात येण्याच्या दिशेने प्रयत्न करू लागतो तेव्हा कर्माच्या संबंधाना समजण्याची शक्ती जागृत होते. आत्म्याकडे येणाऱ्या कर्मप्रवाहाना जेव्हा जागृतपणे पाहतो तेव्हा या कर्मांचे परिणाम किती दुःखदायी आहेत ही समज त्याला येते. संसारीक सुख नव्हे सुखाभास आहे याची त्याला जाणीव होते. अशा सुखाचा अतं दुःखरूपात होती है। ही तो समजतो.
पनि आत्मभावनाचे चिंतन त्याच्या अंतरंगात स्फुरित होतात. मग तो विचार करू लागतो या कर्मप्रवाहाला थांबवायला पाहिजे. अशा प्रकारच्या चिंतनाला संवर आराधना म्हणतात.
व्रत प्रतिमा तथा उत्तरवर्ती असत्वर्जन मूलक प्रतिमा अशा भावनेशी निगडित आहेत. जोपर्यंत अंतःकरण संवर भावनेने सिंचित होत नाही तो पर्यंत या प्रतिमा सिद्ध होऊ शकत नाहीत. जरा पुढे जाऊन पाहू. निर्जरा भावना काय आहे ? आत्म्यावर येणाऱ्या कर्माच्या काळीमेला संवराद्वारे संवरित करून आत्माचा परिष्कार परिमार्जन सम्मार्जन करण्याच्या दृष्टीने संचित कर्मांचे निर्जरण करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी मनात तसे भाव निर्माण होणे जरुरीचे असते. ज्यामुळे तपाचरण करण्याची प्रेरणा मिळू शकते. कारण तपाशिवाय आत्म्याला चिकटलेले, आत्म्यात एकरूप झालेले कर्म, कर्माचे थरचे घर दूर करण्यात समर्थ होत नाही.
निर्जराभावना, आत्मशक्ती ऊर्जा जागृत करते. ती आत्म्यातील सुप्त पराक्रम जागृत करते. त्यामुळे कठीण, दुस्तर तपपूर्ण क्रिया प्रक्रिया साधण्याचे सामर्थ्य उत्पन्न होते. हे भावनात्मक तथा प्रतिमा मूलक उपक्रम ज्यात अभ्यास आणि चर्चा यांचा समन्वय आहे; जीवनाला धर्ममय करतात. धर्मभावनेला यामुळे मोठा आधार मिळतो. वास्तविक धर्मच जीवनातील खरे धन आहे. वैभव आहे. बाह्य वैभवाच्या भ्रांतीमध्ये अडकल्यामुळे