________________
गड हे विभाव आहेत. यापासून दूर राहणे, अथवा परित्याग करण्याची प्रक्रिया व्रत आहे. या दिशेने भावना वाढविणे वैराग्य आहे. अद्यवसाय आचार आहे, सदाचरण आहे. अशाप्रकारे धर्माच्या व्याख्येचे अनेकरूप आहेत. धर्म भावनेच्या चिंतनात अनवरत संलग्न पाहिल्याने परिणाम असा होतो की, जीवात्म्या वैभाविक दशा जाऊन स्वाभाविक दशेमध्ये येण्याकडे उन्मुख होतो. विरती, तितिक्षा, स्वाध्याय, तप, ध्यान इ. जे धर्माचे अंगोपांग आहेत त्याचेच क्रियात्मक रूप आहे.
धर्म भावनेने ओतप्रोत झालेला जीव असा अनुभव करतो की धर्मच एकमात्र माझा कल्याण करणारा आहे.
धर्माचा महिमा व उपयोगिता स्वयंसिद्ध करण्याच्या दृष्टीने धर्मभावनेचे चिंतन फार प्रेरणाप्रद आहे. शास्त्रात, विभिन्न ग्रंथामध्ये, विविध रूपाने हे तथ्य स्पष्ट केले आहे. ह्यामुळे पाठकांना, चिंतनशील व्यक्तींना योग्य जीवनमार्ग प्राप्त होऊ शकतो.
अध्यात्मजगतातील परम तेजस्वी महापुरुष आचार्य कुंदकुंदांनी तात्त्विक दृष्टीने याचे विश्लेषण करताना म्हटले आहे
आत्मविजयामध्ये विश्वास ठेवणारी आचार प्रधान साधनाच मुख्यतः धर्म साधना आहे. जड आणि चेतन यांच्या मिश्रणाचा प्रवाह म्हणजेच संसार आहे. आत्मा अनंत शक्तिवान असूनही सांसारीक स्थितीमध्ये गुरफुटून गेल्यामुळे 'चेतन' आत्मा 'जड' अजीवाच्या आधीन झाला आहे. ह्या आधीनतामुळे सुख-दुःख त्याला जबाबदार आहे. जड चेतनाची ही रासायनिक प्रक्रिया अत्यंत सूक्ष्म आणि जटिल अशी आहे. विज्ञानाच्या आधुनिक विधींनी सुद्धा त्यांची व्याख्या शक्य नाही. जडापासून चेतनाची सुटका करून घेणे म्हणजेच मोक्ष होय. परंतु 'जडाचेबंधन' एकदम सुटणे सहजशक्य नाही. म्हणून जैनधर्मात साधना करण्याचे दोन अंग सांगितले आहेत. मुनिधर्म व गृहस्थ धर्म. ज्यांना क्रमशः अणगारधर्म, व आगार धर्म म्हटले आहे. दिक्षा घेतल्यानंतर मुनिधर्माचे पालन करताना, साधकाने सांसारिक इच्छा व आवश्यकता यापासून मुक्त रहायला पाहिजे. तरीही काही इच्छा अनिच्छापूर्वक लागलेल्याच असतात. ती पूर्ती करण्याचे दायित्व गृहस्थाकडे जाते. गृहस्थ नसेल तर धर्म आधारहीन होऊन जाईल. मुनी साधना जीवित ठेवतो. गृहस्थ त्याला सुरक्षित ठेवतो. म्हणजे गृहस्थाने आपला धर्म व्यवस्थितपणे पाळला तर साधू आपला धर्म व्यवस्थित पाळू शकतात. मुनींना त्यांच्या धर्म साधनेत गृहस्थ सहायक आहे, आधारस्तंभ आहे. म्हणूनच म्हणतात- “न धर्मो धार्मिक बिना", धर्म विश्वाला धारण