________________
करतो, परंतु धर्माला धारण करतो धार्मिक, धर्माची बासुरी गृहस्थाच्या वेळूनेच वाजते. ४४९.
a. परंतु आज धर्माच्या नावाखाली धर्मान्धता वाढत आहे. धर्म तर अमृतासमान आहे. परंतु धर्मान्धता विष आहे. धर्मरूपी अमृताला ग्रहण करण्यासाठी धर्माच्या खऱ्या स्वरूपाला समजणे आवश्यक आहे. धर्मान्धता रूपी विपापासून वाचण्यासाठी त्यातील दर्गुण व दुष्परिणामांना समजणे तितकेच आवश्यक आहे.
माणसाने जर धर्माच्या वास्तविक स्वरूपाला समजून घेतले आणि आपल्या हृदयात धारण केले तर निश्चितच कालांतराने शाश्वत सुख प्राप्त करू शकतो.४५० धर्म केव्हापासून ?
"दुग्ध के साथ धवलता कब से चली आ रही है ?
अग्नि के साथ उष्णता का संबंध कब से है ?" याचे उत्तर - जेव्हापासून दूध आहे तेव्हापासूनच त्याची धवलता आहे. जेव्हपाासून अग्नी आहे तेव्हापासून त्याच्याबरोबर उप्णतेचा संबंध आहे. त्याचप्रमाणे जेव्हापासून भूमी, जल, अग्नी, वायू, प्राणी समूह व जड तत्वांचे आस्तित्व आहे तेव्हापासून धर्म आणि संस्कृती चालत आलेली आहे.
- पृथ्वी इ. मूळ तत्त्व अनादी कालापासून आस्तित्वात आहेत अनंतकाळ आस्तित्वात राहतील. धर्म व संस्कृतीच्या स्वरूपाचे क्षेत्रकाळच्या दृष्टीने हास उत्थान होत राहतो. परंतु संपूर्ण अभाव होणे शक्य नाही.४५१
'नमोत्थुणं'मध्ये धर्मभावना आहे.४५२ धम्मदेसीयाणं पासून धम्मसारहीनं, हे अरिहंत प्रभू! आपणच सर्वोत्कृष्ट मंगलमय धर्माचे प्रवर्तक आहात. धर्माचा उपदेश देणारे आहात. धर्माचे नायक आहात. धर्माचे सारथी आहात. धर्माशिवाय कोणालाच कधीच सुख मिळणार नाही. खरा धर्मच आत्मधर्म आहे. आपण आमच्यावर कृपाकररून असा धर्म दाखवला आहे. शाश्वत सुखाचा मार्ग प्रशस्त करून दिला आहे. हे आमच्यावर आपले अनंत उपकार आहेत.
अरिहंत प्रभू संसारात राहून संसाराचे भीषण दुःख जन्म मरण आहे ते पूर्णपणे नष्ट करण्याची औषधी शोधन काढली. त्याचे सेवन करून. आराधना करून अनंत अव्याबाध आत्मिक सुख प्राप्त केले. आणि नंतर त्या औषधीचा उपयोग सर्व जीवांच्या कल्याणासाठी उपदेश रूपाने वाटला. असे आनवरहित महायोगात्मक परम निर्जराचे कारण