________________
(५२७)
आणि मिळालेल्या बोधी रत्नावा नीट जोपासून ठेवता आले नाही तर कसा पश्चाताप करावा लागतो त्याच्यासाठी एक प्रसिद्ध उदाहरण आहे.
एका दारिद्र ब्राह्मणाला अतिशय कष्टाने देव आराधना करून चिंतामणी रत्न प्राप्त झाला. तो रत्न त्याने खिशात पाकीटात न ठेवता हातातच धरून ठेवला व अभाग समुद्र पार करण्यासाठी तो जहाजेत बसला. लोकांनी त्याला फार समजवले परंतु तो रत्न दुसरीकडे कुठेच न ठेवता कुणी हातातून पण न घ्यावे ह्या भीतीने त्याने हात पण जहाजेच्या बाहेर ठेवला. एकदा त्याला बसल्या बसल्या झोपेची डुलकी आली त्याच्या हाताच्या रत्नाची पकड सैल झाली आणि रत्न समुद्रात पडला. रत्न पडताच त्याचे डोळे उघडले पण दुःखाची गोष्ट! निराशा आणि विलापाशिवाय त्याच्याजवळ काहीच शिल्लक नव्हते. गेलेला रत्न कोणत्याही प्रकारे त्याला मिळेल तसे नव्हते म्हणून तो जोर जोराने रडू लागला. पुन्हा दारिद्र अवस्थेत घरातून जसा निघाला होता तसाच पुन्हा घरी पोहोचला. पण जीवनभर त्याला पश्चाताप करावा लागला. त्याचप्रमाणे मनुष्य भव आणि बोधीरत्न प्राप्त करण्याची संधी जर हातातून गेली तर त्या दरिद्र ब्राह्मणाप्रमाणे पश्चाताप करावा लागेल म्हणून बोधी रत्न प्राप्त करून त्याचे खूप चांगल्याप्रकारे रक्षण करायला पाहिजे. अप्रमत्त राहून स्वकल्याण केले पाहिजे. स्वतःला ओळखणे आणि आत्म्यात लीन होणे हीच बोधी आहे. दर्शन, ज्ञान, चारित्र आहे. हे दर्शन, ज्ञान, चारित्र प्राप्त करणेच अत्यंत दुर्लभ आहे आणि ह्या बोधीच्या दुर्लभतेचा विचार, चिंतन पुन्हा पुन्हा करणे बोधी दुर्लभ भावना आहे. ४४६
एक बाजू जन्म व दुसरीकडे मरण ह्या दोघांच्यामध्ये शरीरात जिवंत राहणारा हा जीव दुःखी होत आहे जसे एरंडाची पोकळ लाकडी दोनी बाजूने जळते त्याच्या मध्यभागी असलेला कीडा मरणाच्या तयारीत असतो. म्हणून ह्या शरीराचा मोह सोडून निर्ममत्व भावनेचे चिंतन केले पाहिजे. ४४७
जैन दर्शन आत्मदर्शन आहे. साधकाने स्वतःला ओळखून स्वात्म्यात लीन व्हायचे आहे. 'पर'ला सोडून स्व मध्ये राहाण्याचे ज्ञान होणे परिभ्रमणाने मुक्त होण्याचे ज्ञान प्राप्त करावे आणि अज्ञानाने दूर राहावे, आत्म्याचा बोध करावा हेच ह्या भावनेचे मूळ उद्देश्य आहे.
मानव जीवनात प्राप्त करण्यासारखे काही उत्तम तत्त्व असेल तर ती बोधी आहे. जीवनात सर्व काही प्राप्त केले पण त्याने बोधी प्राप्त केली नाही तर काहीच महत्त्व नाही. कारण मृत्यूनंतर सर्व काही इथेच सुटून जाते. बोधी परलोकात आपल्या बरोबर येते.