________________
(५२५)
सम्यग्दृष्टी विचार करतो की माझा ज्ञानमय आत्मा पुद्गला पासून सर्वथा भिन्न आहे. म्हणून मला कोणतीच व्याधी होऊ शकत नाही. मग मला भय कशाचा ? जितक्या व्याच्या आहेत त्या सगळ्या शरीरालाच होतात, अर्मूत आत्म्याला एक पण व्याधी होत
नाही. ४४२
ज्याप्रमाणे आकाश हे अमूर्त पदार्थ आहे तो कशाही प्रकारे जळू शकत नाही. त्याच प्रमाणे आत्मा पण अमूर्त पदार्थ आहे. त्याचा पण नाश होऊ शकत नाही ४४३ अशा प्रकारच्या चिंतनाने सम्यग्दृष्टीचा आत्मा उत्तरोत्तर जास्त आत्मविशुद्धी करतो. सम्यक्त्याची लक्षणे
म्हणतात
क्रोधादी कषायाचा उपशम किंवा क्षय होणे.
शम
संवेग - मोक्ष प्राप्तीची इच्छा असणे.
निर्वेद - जगापासून उदासिनता रूप वैराग्य असणे.
अनुकम्पा
प्राण्यावर दयाभाव ठेवणे.
आस्तिक्य जिनेन्द्र भगवान द्वारा सांगितलेले पदार्थ, परलोक, आत्मा परमात्मा इत्यादी अतिन्द्रिय पदार्थावर पूर्ण आस्था श्रद्धा असणे.
ज्या व्यक्तीमध्ये हे पाच लक्षण दिसून येतात ते सम्यक्त्वि आहे. पं. जुगलकिशोर
"जागे मम दुर्लभ बोधी प्रभो, दुर्नय तम सत्वर टल जावे ।
बस ज्ञाता दृष्टा रह जाऊँ, मद मत्सर मोह विनस जावे || ४४२
जर माझ्या अंतःकरणात जी प्राप्त करणे अत्यंत दुर्लभ आहे अशी बोधी जागृत झाली तर दुर्नयाचा अंधकार लगेच नष्ट होईल मगमी ज्ञाता दृष्टा बनून जाईल, मद मत्सर मोह विनष्ट होतील.
स्वतःला ओळखणे आणि आत्म्यात लीन होणे हीच बोधी आहे. दर्शन, ज्ञान, चारित्र आहे. हे दर्शन, ज्ञान, चारित्र प्राप्त करणेच अत्यंत दुर्लभ आहे आणि ह्या बोधीच्या दुर्लभतेचा विचार चिंतन, पुन्हा पुन्हा करणे बोधी दुर्लभ भावना आहे. ४४५
एखादी व्यक्ती ह्या जीवाला बोधीलाभ होणे अत्यंत कठीण समजून अनुत्साहित होतो व पुरुषार्थ रहित होऊ लागतो पण त्याने हे पण चिंतन केले पाहिजे की बोधी सुलभ कशी होईल ? जो पर्यंत जीव संज्ञी पंचेन्द्रिय दशा प्राप्त करत नाही तो पर्यंत
+