________________
(५२४)
दृष्टीभेदामुळे संसाराच्या वस्तू वेगवेगळ्या दिसतात. मिध्यात्वी संसाराच्या वस्तूला भोग्य मानतो, सम्यक्त्वि त्या वस्तूंना स्वतःपेक्षा भिन्न समजतो. धन्नासेठ ज्या सुभद्राला पत्नी समजत होते दृष्टी बदलली तर तिला बहीण मानून तसा व्यवहार करू लागले.
प्रथम तीर्थंकर ऋषभदेव भगवानाचे ९८ पुत्र भरत चक्रवर्तीची अधिनता स्वीकारण्यासाठी तैयार नव्हते ते प्रभू ऋषभदेव जवळ गेले. ऋपदेव भगवान म्हणाले शाश्वत मोक्षलक्ष्मी प्राप्त करा, ही लक्ष्मी तर एक न एक दिवस सुटणारच आहे. वाणीचा प्रभाव मनावर झाला. दृष्टी बदलली आणि तिथेच सर्व संसाराच्या भोगापभोगांचा त्याग केला व दीक्षित झाले.
आवश्यकता दृष्टीच्या परिवर्तनाची आहे. मिथ्यात्व सोडून सम्यक्त्वात येण्याची आहे. सम्यग्दर्शन प्राप्त होताच मुक्ती निकट होईल. संसाराचे स्वरूप बदलून जाईल नंतर लहान बाळासारखे बोर प्राप्त करण्यासाठी किंमती हिरे फेकणार नाही. मिथ्यात्वी अमूल्य मानवाला भोगासाठी व्यर्थ घालवतो पण सम्यक्त्वि त्याचे मूल्य समजून सार्थक करता.
सम्यक दर्शन प्राप्त करणे फार महत्त्वाचे आहे, त्याचा फार मोठा लाभ आहे. जसे जन्मांध मनुष्याला अचानक डोळे मिळाले असता, अथवा भयंकर रोग नष्ट होता जो आनंद होतो त्याच्या पेक्षा अनेकपट आनंद जीवाला सम्यक्त्व प्राप्तीने मिळतो.
ake
ज्याक्षणी सम्यक्त्व प्राप्त होतो त्या क्षणीच जीवाचे मोक्ष गमण नक्की होते. निगोद पासून सम्यक्त्व प्राप्तीपर्यंतची प्रक्रिया पाहाता बोधी प्राप्त करणे किती दुर्लभ आहे हे समजून येते. अशाप्रकारे बोधी प्राप्त होणे किती दुर्लभ आहे ह्याचे चिंतन करणे व त्या प्रक्रियेच्या स्वरूपाचे ज्या भावनेत चिंतन केले जाते ती बोधीदुर्लभ भावना
आहे.
बोधिरत्न सम्यक्त्वाचे स्वरूप
अरिहंतो मह देवो, जायज्जीवं सुसाडुणो गुरुणो ।
जिण पण्णतं तत्तं, इअ सम्मत्तं मए गहियं ॥
अरिहंत अर्थात राग द्वेषाचे त्यागी वीतरागी सर्वज्ञ अरिहंत परमात्मा हेच माझे देव आहेत, आणि अजीवन पाच महाव्रत धारी त्यागी, तपस्वी श्री जिनेश्वर भगवंतांनी जे तत्वाचे स्वरूप सांगितले आहे. तोच माझा धर्म आहे. हे आहे सम्यक्त्वाचे स्वरूप अर्थात खऱ्या श्रद्धेचे स्वरूप.
सुसाधू माझे
गुरू आहेत.
1
18-9-04