________________
(५२३)
हमान तर प्रत्येक जीवात्म्यात असतोच सम्यक्त्व प्राप्तीनंतर कुमती, कुश्रुत, कुअवधी तीन मिथ्याज्ञान निर्मळ होतात. जीव, अजीच, पुण्य, पाप, आनव संवर, निर्जग, बंध
म मोक्ष ह्या नऊ तत्वावर श्रद्धा होते. म्हणून सम्यक्त्वाचे महत्त्व सर्वाधिक आहे. मलं धर्मस्य सम्यक्त्वम्' सम्यक्त्व हे धर्माचे मूळ आहे. 'सम्यक्त्वं परमं रत्नम' शुद्ध वा सर्वोत्तम रत्न आहे. 'तत्वनिश्चय रूपं तद बोधि रत्नं सुदुर्लभम् वस्तू तत्वाच्या यक स्वरूपावर विश्वास होणे आणि तत्वनिश्चय रूप श्रद्धा रत्नाची प्राप्ती होणे फार कठीण आहे. आणि आत्मतत्वाचे निश्चित ज्ञान झाल्या शिवाय शेकडो युग गेले, सर्वस्वाचे दान केले तरी मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही.१४१
इथे एक प्रश्न होतो की सम्यग्दर्शन प्राप्त करण्यासाठी ज्ञान आणि क्रियेचा काही योगदान आहे की नाही ? त्याचे समाधान हे आहे की ज्ञान आणि क्रिया सम्यक नसले तरी पण सम्यग्दर्शन प्राप्त करण्यात सहयोगी बनतात. कारण जो पर्यंत मोहनीय कर्माची स्थिती अन्तःकोटाकोटी सागरोपमाची होत नाही तो पर्यंत सम्यगदर्शन प्राप्त होत नाही. मोहनीय सहित सात कर्माची एक आयुष्यकर्म सोडून उत्कृष्ट बंध स्थिती सत्तर (७०) कोटाकोटी सागसोपमाची होते. ती अन्तःकोटाकोटी सागरोपमा पेक्षा पण कमी राहणे हे कोणत्याही क्रिया अथवा पुरुषार्थाशिवाय संभव नाही. ह्याच्यात ज्ञान आणि क्रिया याचे मुख्य योगदान आहे. जर विचार शुभ नसले तर आचार शुभ होणार नाही आणि विचार व आचार शुभ नसले तर सत्तर (७०) कोटाकोटी मोहकर्माची स्थिती अन्तः कोटाकोटी मात्र कशी राहील ? आणि मोह कर्माची स्थिती कमी झाली की आयुष्य कर्म सोडून बाकीच्या सर्व कर्माची स्थिती कमी होते. म्हणजे तप, संयम इत्यादीने होणारी निर्जरा पण कर्म क्षय करण्यास साधन रूप आहे. ती सम्यक् असो अथवा नसो.
श्रुतज्ञानाच्या आधारे चिंतन मनन करणे तसेच कर्म निर्जरच्या भावनेने तपसंयम करणे ह्याला मात्र प्रदर्शन म्हणता येणार नाही हा तर मार्ग आहे. त्याच्याने सम्यग्दर्शनाची प्राप्ती सम्भव होते. जर मार्गाचाच निषेध केला तर सम्यगदर्शनापर्यंत कधी पाचूच शकणार नाही. म्हणून तप संयम इत्यादी व्यवहार धर्माचा निषेध करून मात्र सम्यग्दर्शनाची प्ररुपणा करणे योग्य नाही.
नवनीत प्राप्त करण्यासाठी दही घुसळण्याचे साधन रवीची (बिलौनी) दोरीचे । टोक क्रमाक्रमाने खेचले पाहिजे तर नवनीत मिळते तसेच निश्चय आणि व्यवहार दुष्टाचे महत्त्व आहे. एकान्त रूपाने व्यवहार अथवा निश्चयावर जोर देणे योग्य नाही.