________________
उद्यत होता. जर
जर पर्णपणे पंचमहाव्रत धारी साधक जीवन स्वीकार करू शकला नाही तर भागार सहित श्रावक व्रत जीवन यापन करतो. गृहरस्थ व्रत धारण करतो. अशाप्रकार आत्मगुणाच्या
गणांच्या विकासाबरोबर गुणस्थानात प्रगती करतो. तो अविरत सम्यक्त्वी पासून
की बनन जातो. आपल्या शक्तीनुसार तो व्रतांचा स्वीकार करतो. त्याचे भोगमय जीवन त्यागमय बनते.
जेव्हा जगाचे विचित्र स्वरूप पाहतो, लोकांची स्वार्थपरायणता पाहतो तेव्हा एकत्व भाव अधिक प्रबल होतो. तो विचार करू लागतो हे बाह्य जगत जेवढे आहे ते सर्व पर आहे त्यांच्याकडून मी कशाला अपेक्षा ठेवू ? हे कोणी ही मला शरण देण्यास समर्थ नाहीत. ही अन्यत्व भावना अशरणत्व इ. भावनांचा उन्मेश होऊन मनात अधिकच स्फूर्ती जागते. वैराग्यभाव वृद्धींगत होतो. आंतरीक दुर्बलता समाप्त होते. विरक्तीचा भाव प्रबल होतो. विकल्प, अपवादाचा त्याग करून सर्वथा विरतिमय, संयममय जीवन अंगिकारतो. श्रमणोपासक भूमिकेतून पुढे विकास करतो. श्रमण भूमिका स्वीकारतो. तो पाचव्या गुणस्थानातून सहाव्या गुणस्थानात पदार्पण करतो. ज्याला प्रमत्त संयत म्हणतात. जरी बाह्यदृष्टीने प्रमत्त किंवा प्रमादयुक्त नसतो. परंतु आत्मस्वरूपोन्मुखी उत्साहचे सातत्य नसते.
साधनेचा मार्ग जरी दुर्गम आहे. परंतु जस-जसे आत्मबल वाढत जाते त्याचे जीवन सुगम होत जाते. साधकाच्या मनात जसजसा भावनांचा उत्कर्ष होत जातो, त्याच्या आत्मगुणांचा ही विकास होतो. जेव्हा तो कर्मप्रवाह, लोकप्रवाह इ. वर चिंतन करतो, कमाच्या निरोधावर विचार करतो. त्या कर्मांच्या निर्जरण संबंधी व कर्माच्या विलया संबंधी विचार करतो, चिंतन करतो तसतसे त्याचे जीवन जास्तीत जास्त संयममय, तपाचरणाकडे उत्कर्षित होत जाते. गुणस्थान उर्ध्वमुखी बनतात. जर तो आपल्या साधनेच्या क्रमात अपक किंवा क्षययुक्त श्रेणींचा स्वीकार केला तर पुढे प्रगतीशील बनून वीतराग भाव प्राप्त करता. जे त्रयोदश गुणस्थान धारक आहे. पुढे चौदाव्या गुणस्थानात शुक्लध्यानाच्या माध्यमाने जीवनाचा परमसाध्य मोक्ष प्राप्त करतो.
ह्या भावनांचे चिंतन, मनन, अनुभावन गुणरस्थान मूलक साधनेत किती उपयोगी
आहे हे या विवेचनावरून सिद्ध होते.
सम्यक् बोधीची पायरी चढल्याशिवाय परम साध्य मोक्षाप्रत पोहोचणे शक्य नाही. जीवा
जावात्मा जेव्हा प्रथम मिथ्यात्व गुणस्थाना पार करून सम्यक्त्वात येतो एकदा पण वा स्पर्श करतो. मग त्याचा उत्तरोत्तर विकास होतच जातो. सम्यक्त्व होण्याच्या