________________
ता श्रेयस्कर्ता एक असे सजीव चित्र उपस्थित करतो, ज्यामुळे मनात सहजपणे योग्य भावनांचा उद्गम होऊ लागतो.
बोधी दुर्लभ भावनेचे चिंतन करता करता जीव निगोद पासून मोक्षापर्यंतचा संपूर्ण विकास क्रम पाहू शकतो. ह्या विकास क्रमाला डोळ्यासमोर ठेऊन स्वतःमध्ये जो काही कमीपणा आहे त्याला दूर करून पूर्णतेला प्राप्त करू शकतो. सम्यक्त्वादी रत्नांना प्राप्त करण्यासाठी भगिरथ पुरुषार्थ करू शकतो. आणि स्वतःच्या अवस्थेचे संपूर्ण ज्ञान झाले असता आध्यात्मिक विकास क्षेत्रात मी कुठे आहे ? आणि मी कसा आहे ? ते प्रत्यक्ष पाहू शकतो.
जैन आगमात आत्मविकासाची क्रमिक वृद्धी पाहण्यासाठी गुणस्थानाच्या चौदा पायऱ्याचे वर्णन प्राप्त होते त्यात जीवात्मा पाहू शकतो की मी कोणत्या अवस्थेपर्यंत पोहोचलो आहे. आणि मला कुठपर्यंत पोहोचायचे आहे. भावनेच्या आधारे जीवात्म्याचा क्रमिक विकास कसा होतो त्याचे वर्णन पुढे केले गेले आहे.
गुणस्थान क्रमाच्या विकासात भावनांची प्रेरकता जो पर्यंत जीवाबरोबर कर्माचा संबंध आहे तो पर्यंत त्याला कार्यशील रहावेच लागते. कर्म हे असे आवरण आहे जे आत्म्याच्या सचित आनंदमय स्वरूपाला नेहमी आच्छादित ठेवतात. या दैहिक जीवनात जे काही घटित होते ते सर्व कर्मांच्या औदयिक इ. भावनेच्या परिणामामुळे.
मानव एक पुरुषार्थशील प्राणी आहे. तो आत्म पराक्रमाद्वारे शुद्धात्म भाव दिशेने गतिशील राहतो. विकारांना नष्ट करतो. सद्गुणांना स्वीकारतो. ज्यामुळे आत्म्यावरील कलुषता नष्ट होते. म्हणून जीवनात अध्यवसाय, पुरुषार्थ, प्रयास किंवा उद्यमाची महत्ता आहे.
आश्चर्य तर हे आहे की आंतरीक शक्तीचा धनी असूनही जीव उत्तम अध्यवसायद्वारा कर्म क्षय करण्यासाठी उद्यत होत नाही. जीवाने आत्मोकर्षाच्या मार्गावर आरूढ होण्याच्या हेतूने जैनाचार्यांनी भावनांचे विशेष प्रकारचे विवेचन केले आहे. आत्मिक शाच्या विकासासाठी या बारा भावनांचे किती महत्त्व आहे हे त्यांनी अनेक प्रकारांनी समजावण्याचा प्रयास केला आहे. जीवाची सर्वात निम्न कोटी अवस्था आहे मिथ्यात्व '. असत्याला सत्य मानणे या मिथ्याविश्वासामुळे त्याचे सर्व कार्य आत्म्याच्या विपरीत 1. अकल्याणकारी होतात. हाच क्रम असाच चालत राहिला तर जीवात्मा कधीच
माग प्राप्त करू शकणार नाही. तो केवळ भौतिक सुखाच्या मृगजळाच्या भ्रांतित