________________
SOHALA
मितीच्या दृष्टीने त्याचे ज्ञान विपुल असले तरी आत्मश्रेयसच्या मार्गापासून ते दरच आम्हणजे बुद्धीच्या स्तरावर अतिशय ज्ञानवान व्यक्ती असेल पण त्याला जर सम्यकबोधी प्राप्त नसेल तर ते ज्ञान, ज्ञान नव्हे अज्ञानच म्हणावे लागेल. मोक्षाप्रत नेणारे. नातच खरे ज्ञान असते. जैनदर्शनात अशा केवळ बुद्धिगम्य ज्ञानाला निप्प्रयोजन म्हटले आहे म्हणून ते अज्ञान आहे. जैनदर्शनात मतिज्ञान, श्रुतज्ञान आणि अवधिज्ञानाबरोबर मतिअज्ञान, श्रुतअज्ञान, विभंग ज्ञानाचा जो उल्लेख आहे त्याचा आशय हाच आहे. माहितीच्या दृष्टीने सम्यक्त्वी, सम्यगदर्शन द्वारा मतिज्ञानाच्या माध्यमाने जे जाणले जाते, त्याचप्रमाणे, मिथ्यात्वी द्वारा जाणले जाते. माहिती तर दोघांना आहे. परंतु सम्यगदृष्टीचे ज्ञान मतिज्ञान युक्त आहे. आणि असम्यग्दृष्टी असलेल्याचे ज्ञान मतिअज्ञान आहे. याच कारणामुळे बोधिदुर्लभ भावनामध्ये साधकाला खूप प्रेरणा दिली जाते. कारण जीवनात सम्यक्बोधी प्राप्त करणे म्हणजे साधारण उपलब्धी नाही. अति अति महत्त्वपूर्ण आहे. सम्यग्बोधीमुळेच जीवन सार्थक होते. या बोधीशिवाय देवदुर्लभ असे हे मनुष्य जीवन व्यर्थ आहे.
जो जीव सुलभबोधी असतो त्याला ज्ञान, श्रद्धा, चारित्र आणि तपामध्ये सहज रची असते. सुलभ बोधी असणे याचा अर्थ आहे. त्या सीमेपर्यंत पोहोचणे जेथून सरळ उड्डाण घेऊन मोक्षाप्रत जाऊ शकू. सुलभ बोधी व्यक्तीची गणना श्रावक, धार्मिक वर्गात केली जाते. याचा सरळ अर्थ आहे बोधी सम्यक्त्त्वाची सुलभता.
। बोधी प्राप्त होण्यात बाधक आहे- अवर्णवाद जी व्यक्ती दुर्लभ बोधी असते त्याला समजावणे अती कठीण, त्याला उपदेश देणे व्यर्थ. तो प्रतिबुद्ध होऊच शकत नाही. स्थानांग सूत्रात याचे पाच कारण सांगितले आहेत. ज्यामुळे जीवाला बोधी प्राप्त होत नाहा असे कर्म बांधलेले असतात. आपल्याला जर आपले कल्याण करायचे असेल तर भावना समजावून घेऊन त्याप्रमाणे भावित व्हायला पाहिजे. यासाठी सतत भगीरथ प्रयत्न, पुठ्यार्थ करण्यासाठी कटिबद्ध झाले पाहिजे.
- अवर्ण शब्दाचे दोन अर्थ आहेत - एक निंदा, दुसरा अर्थ आस्तित्वाचा
कार. अर्हत, अर्हत निरुपित धर्म, आचार्य, उपाध्याय, चतुर्विध धर्मसंघ. देव या या बद्दल कोणतीही बोधिदुर्लभ भावनेचे सैद्धांतिक तात्त्विक आणि भावोत्प्रेरक दृष्टीने लल वरील विवेचन निश्चितच अध्येताच्या मनात बोधीची दुर्लभता, त्याची प्राप्ती त्याची